- जाहिरात -spot_img
breaking news

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

पीडिता तीन महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साडेतेरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर बापाने व एका हॉटेल चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीचा बाप व हॉटेल चालक अशा दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.याप्रकरणी पोसो, बलात्कार यासह विविध कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात पीडित मुलगी ही आपल्या आजी, आजोबा व वडिलांसह राहत आहे. मुलीच्या आईचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. मुलगी संगमनेर तालुयातील आश्रम शाळेत शिकत आहे, मात्र ऑटोंबर २०२५ रोजी दिवाळीच्या सुट्या लागल्याने मुलगी ही आपले आजी, आजोबा व वडील हे जामखेड तालुयातील सरदवाडी भागात ऊस तोडण्यासाठी आले होते,  त्या ठिकाणी आली होती. या भागातील एका हॉटेलवरील नळावर मुलगी आपल्या आजीसह पाणी आणण्यासाठी जात असे.

यावेळी हॉटेल चालकाची तिच्यावर नजर पडली. मुलीचे घरचे ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्यावर हॉटेल चालक आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना (रा. कुसडगाव ता. जामखेड) याने मुलीस जवळच असलेल्या मयाच्या शेतात नेत तीन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली.यानंतर पीडित मुलीचा बाप नोव्हेंबर २०२५ रोजी दिवाळीनंतर आपल्या कुटुंबासह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुयातील सांगवी याठिकाणी  ऊस तोडणीसाठी आला होता. त्याठिकाणी देखील मुलीच्या नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत अनेक वेळा अत्याचार केला.एप्रिलमध्ये मुलगी संगमनेर तालुयातील आश्रमशाळेत वार्षिक परीक्षा देण्यासाठी दि ९ एप्रिल रोजी आली होती.

यावेळी शाळेकडून मुलीच्या आजीला मुलीची मेडीकल टेस्ट करण्यास सांगितले. मुलीची संगमनेर ग्रामीण रुग्णालयात मेडीकल टेस्ट केल्यानंतर अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती आसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.संगमनेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीस व बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांनी मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केली. आरोपी हॉटेलचालक जयदत्त सदाशिव कात्रजकर व मुलीचा बाप अशा दोघांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह त्यांच्या पथकाने दि.१४ एप्रिल रोजी रात्री बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रविणचंद लोखंडे हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  अवैध सावकारी आली अंगलट ...कारण काय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ