- जाहिरात -spot_img
breaking news

शिंगोरीचा हर्षद चेमटे ठरला एशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णविजेता

थायलंडमध्ये भारताचा तिरंगा दिमाखात फडकावला
शेवगाव | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील युवा कुस्तीपटू हर्षद चेमटे याने केली आहे. थायलंडमध्ये सुरू असलेल्या 15 वर्षांखालील एशियाई चॅम्पियनशिप कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत हर्षदने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावला. अंतिम फेरीत हर्षदने कजाकिस्तानच्या येरसुल्तान सुलेमान याच्यावर 11-10 अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात त्याने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आक्रमक खेळी आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर विजय संपादन केला. शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावचा रहिवासी असलेल्या हर्षदने अल्पवयातच कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूव राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्णयश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

हर्षदच्या या ऐतिहासिक यशाबद्दल केदारेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा ॲड प्रतापराव ढाकणे, पैलवान गणेश दांगट, कोच रामसिंग राजपूत, पैलवान सागर कोल्हे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान युवराज भोसले, जिल्हा परिषद सदस्य युद्धजीत पंडित, जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, शिवसेनेचे नेते अरुण मुंढे, माजी सदस्य नितीनभाऊ काकडे, उपसरपंच संग्राम काकडे, फिरोज पठाण, गणेश बडदे, प्रभाकर चेमटे, सरपंच भोरु मस्के, सुखदेव गुठे, माजी चेअरमन महादेव घोरतळे, भीमराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

हे सुद्धा वाचा :  वाघोली ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर मुंडन आंदोलन...नेमकं काय झालं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ