नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
सोन्याचे दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर आज कमी झाले आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज होळीच्या दिवशी खुशखबर मिळाली आहे. त्यामुळेच तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे.
सणासुदीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेकजण आज होळीला सोनं खरेदी करतात. जर तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर आजचा मुहूर्तदेखील चांगला आहे त्याचसोबत सोन्याचे दर घसरले आहे. सोन्याचे दर १ तोळ्यामागे ३२९० रुपयांनी घसरले आहेत.
आजचे सोन्याचे दर
गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर ३२९० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर १,६९,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे २,६३२ रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर १,३५,८४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ३२,९०० रुपयांची घसरण झाली आहे.
२२ कॅरेटचे दर
गुडरिटर्न्सनुसार, २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५५,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २,४०० रुपयांनी घसरुन १,२४,५२० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे ३०,००० रुपयांची घसरण झाली असून हे दर १५,५६,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,४६० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळ्यासाठी तुम्हाला १,२७,३५० रुपये मोजावे लागणार आहेत. १० तोळ्यामागे २४,६०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १२,७३,५०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,९६८ रुपयांनी घसरले असून १,०१,८८० रुपये झाले आहेत










