- जाहिरात -spot_img
breaking news

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला मोठा निर्णय;

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला मोठा निर्णय;
कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द

मुंबई/नगर सह्याद्री :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलया आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री देसाई यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत असून “देश प्रथम” या भूमिकेचे हे उदाहरण मानले जात आहे. वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे. देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा :  बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी, राज्याचा निकाल 'इतके' टक्के पहा सविस्तर...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ