- जाहिरात -spot_img
breaking news

सुजित झावरे यांचा वाढदिवसाचे बॅनर फाडले; शहरात तणाव, काय घडलं पहा

विकासकामांच्या श्रेयावरून वाद? सलग दुसर्‍यांदा फलक फाडल्याने शहरात तणाव
पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर शहरात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे झावरे पाटील यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सोमवार, २३ मार्च रोजी झावरे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरातील बस स्थानक, खालची वेस, तहसील कार्यालय परिसर तसेच कान्हूरपठार चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी शुभेच्छांचे मोठे बॅनर लावले होते. मात्र, हे फलक लावल्यानंतर काही तासांतच रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी ते फाडून टाकले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात चर्चेला उधाण आले असून, या कृत्यामागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

झावरे पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारनेर शहरात विकासकामांच्या मागण्यांनी जोर धरला आहे. शहराचा डीपीआर मंजूर करून आणणे आणि रखडलेली पाणी योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘पारनेर शहराच्या विकासाचे शिल्पकार’ आणि ‘बोले तैसा चाले’ असा उल्लेख करण्यात आला होता. यापूर्वीही डीपीआर मंजुरीचे फलक फाडल्याची घटना घडली होती, त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा संशय समर्थकांनी व्यक्त केला आहे.

कितीही विरोध झाला तरी विकासकामे थांबणार नाहीत
निंदकाचे घर असावे शेजारी. तुम्ही माझे शुभेच्छा फलक फाडले असतील, पण माझे काम आणि जनतेची साथ तुम्ही कधीही फाडू शकणार नाही. मी काम करणारा माणूस आहे आणि कितीही विरोध झाला तरी शहराची विकासकामे थांबणार नाहीत.
– सुजित झावरे पाटील, शिवसेना नेते

हे सुद्धा वाचा :  सतलोक आश्रमाच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची शक्यता
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ