- जाहिरात -spot_img
breaking news

विचित्र अपघातात ११ प्रवाशांचा करुण अंत, कुठे घडला अपघात पहा…

नवी दिल्ली / वृत्तसांस्था :
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा रेवा-मिर्झापूर महामार्गावरील ड्रमंडगंज खोऱ्यात एका ट्रेलरला कारची धडक बसल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. बोलेरोमधील नऊ जण जिवंत जळाले. त्याचप्रमाणे, स्विफ्ट कारमधील प्रवासी जय प्रकाश (२६) यांचाही मृत्यू झाला.

जय प्रकाश हे सोनभद्रमधील परसिया दुबे रॉबर्ट्सगंजचे रहिवासी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान ट्रक चालकाचा मृत्यू झाला. मिर्झापूरच्या जिल्हाधि-यांनी या अपघातात ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर गावातील रहिवासी अरुण सिंग यांचे कुटुंब त्यांच्या नऊ वर्षांच्या शिवचे मुंडन करण्यासाठी बोलेरोमधून मैहरला गेले होते. हे कुटुंब मैहरहून मिर्झापूरला परत येत होते.

बोलेरोमध्ये पंकज सिंग, बिना, वंदना, पियुष, प्रियांका, कार्तिकेय आणि सोनम होते. विष्णू बोलेरो चालवत होता. बुधवारी रात्री मध्य प्रदेशातून खडी घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरचे ब्रेक अचानक निकामी झाले.

अनियंत्रित झालेल्या ट्रेलरने स्विफ्ट कारला आणि एका ट्रकला धडक दिली. दरम्यान, रेवाहून येणाऱ्या एका बोलेरोने मागून ट्रेलरला धडक दिली, ज्यामुळे मोठा स्फोट झाला आणि बोलेरोला आग लागली.

धडकेचा परिणाम इतका तीव्र होता की, बोलेरो पूर्णपणे चक्काचूर झाली आणि आतील प्रवासी अडकले. आग इतक्या वेगाने पसरली की बोलेरोमधील नऊ जण जिवंत जळाले. स्थानिकांनी ड्रमंडगंज पोलिसांना माहिती दिली. लालगंजचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्यास मदत केली.

अपघातानंतर चारही वाहनांची ओळख पटली आहे. एक ट्रक बिहारचा, दुसरा मध्य प्रदेशचा, कार सोनभद्रची आणि बोलेरो मिर्झापूरची आहे. याप्रकरणी तपास सुरू असून काही कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदत जाहीर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा :  तामिळनाडूमधील सस्पेंन्स संपला! ‘विजय’ सरकारला हिरवा कंदील; शपथविधी ठरला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ