- जाहिरात -spot_img
breaking news

प्राजक्त तनपुरे अपक्ष लढणार!; काँग्रेस, ठाकरे सेनेने थोपटले दंड…

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासमोर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आव्हान असणार आहे. तनपुरे हे अपक्ष लढणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय गोटातून सांगण्यात आले असून सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी ते अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येते.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. कार्यकर्त्यांचा संच, त्यांची मागणी आणि भविष्यातील राजकारण याचा सारासार विचार करता तनपुरे थांबण्याची शक्यता कमीच होती.

प्राजक्त तनपुरे यांनी गेल्या महिना- दोन महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला. अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत त्यांनी बैठकाही घेतल्या. पक्षाची उमेदवारी करण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी केल्यास त्याचा मोठा फायदा मिळू शकतो असे निरीक्षण अनेक बैठकांमधून पुढे आले. त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. तनपुरे यांच्या उमेदवारीमुळे नवख्या समजल्या जाणार्‍या अक्षय कर्डिले यांना मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

विळद घाटात बैठकांचा सिलसिला!
राहुरीची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बांधला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३) दिवसभर विळद घाट येथील कार्यालयात राहुरी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्ंया. राहुरीसह नगर आणि पाथर्डी तालुक्यातील अनेकांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

बारामती, राहुरीत काँग्रेसने थोपटले दंड
मुंबई | नगर सह्याद्री
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षश्रेष्ठींनी पोटनिवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहितीही काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मित्रपक्षांसोबत चर्चेनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे बारामतीत पोटनिवडणूक होत आहे.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा खरातला झटका; संस्‍थानच्या पाण्‍याचे आरक्षण तातडीने रद्द करण्‍याचे आदेश, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा...

तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केलीय. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेनंतर याबाबत अधिकृत निर्णय काँग्रेसकडून घेतला जाणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, या दोन्ही जागांवर यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे नियमानुसार या जागांवर पहिला हक्क त्यांचाच आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेस या जागांवर आपले उमेदवार उभे करण्यास पूर्णपणे तयार आहे.काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या पोटनिवडणुका लढवण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांना हिरवा कंदील दिला आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून आणि त्यांच्या संमतीनेच अंतिम उमेदवार ठरवला जाणार आहे. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे; जर मित्रपक्षांना त्या ठिकाणी रस नसेल, तर काँग्रेस ती जागा लढवून महाविकास आघाडीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल, असे सपकाळ यांनी नमूद केले.

राहुरीत लढण्याची आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा ः राऊत
राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल. दोन्ही जागा संदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील. राहुरी मध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण भाजपला मदत होईल अशी भूमिका कुणी घेऊ नये असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ