- जाहिरात -spot_img
breaking news

खळबळजनक! मृत्यूनंतर ५ वर्षांनी समोर आली जेफ्री एपस्टीनची ‘सुसाईड नोट’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
अब्जाधीश फायनान्सर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडवून दिली होती. त्याच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्कच्या एका फेडरल कोर्टाने एपस्टीनने मृत्यूपूर्वी हाताने लिहिलेली एक ‘सुसाईड नोट’ सार्वजनिक केली आहे. असे वृत्त रॉयटर्स ने प्रसिध्द केले. या पत्रामुळे एपस्टीन प्रकरणातील गूढ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पत्रात नक्की काय लिहिले आहे?
न्यायालयाने जाहीर केलेल्या या पत्रात एपस्टीनचा संताप आणि अगतिकता दिसून येते. पत्राची सुरुवातच अतिशय आक्रमक आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “त्यांनी महिनोनमहिने माझी चौकशी केली, पण त्यांना काहीही सापडले नाही”.

पुढे तो लिहितो, “निरोप घेण्याची वेळ स्वतः निवडता येणे, ही एक प्रकारे संधी आहे. तुम्हाला काय वाटतं, मी काय करावं? रडत बसू?”. पत्राच्या शेवटी त्याने “NO FUN” आणि “NOT WORTH IT!!” (हे सर्व आता फायद्याचे नाही) असे शब्द लिहून ते अधोरेखित केले आहेत.

पत्र कोठे सापडले?
हे पत्र न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन तुरुंगातील त्याच्या सेलमध्ये सापडले होते. धक्कादायक म्हणजे, हे पत्र एपस्टीनचा तत्कालीन सेलमेट निकोलस टार्टाग्लिओन याला सापडले होते. टार्टाग्लिओन हा माजी पोलीस अधिकारी असून तो हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २०१९ मध्ये एपस्टीनच्या मृत्यूपूर्वी काही आठवडे ते दोघे एकाच सेलमध्ये होते.

न्यायालयाने काय म्हटले?
‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या पत्राच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायाधीश केनेथ करास यांनी हे पत्र उघड करण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयाने हे स्पष्ट केले की, हे पत्र सार्वजनिक करण्याचा अर्थ असा नाही की, न्यायालय या पत्राच्या सत्यतेची पुष्टी करत आहे. हे पत्र आता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याने ते जनतेसमोर येणे कायदेशीररीत्या आवश्यक होते.

मृत्यूचा घटनाक्रम
जुलै २०१९ मध्ये एपस्टीन आपल्या सेलमध्ये जखमी अवस्थेत सापडला होता, ज्याला अधिकाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न म्हटले होते. त्यानंतर १० ऑगस्ट २०१९ रोजी त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार ती आत्महत्या होती, परंतु जगभरातील अनेक स्तरातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अल्पवयीन मुलींची मानव तस्करी या गंभीर आरोपाखाली एपस्टीन खटल्याची वाट पाहत होता. त्याच्या संबंधांचे जाळे राजकारण, व्यापार आणि मनोरंजन क्षेत्रातील राजकारण, कला क्षेत्रातील दिग्गजांची नावं असल्याने या पत्राच्या खुलासा झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे.

हे सुद्धा वाचा :  धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानचे राजकीय कनेक्शन उघड; धक्कादायक अपडेट समोर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ