- जाहिरात -spot_img
breaking news

शवविच्छेदनासाठी मागितले पैसे ……संतापजनक घटना कोठे घडली

पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी पारनेर शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदनासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडले.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाचे पत्र आवश्यक असल्याचे, संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याचे तसेच शवविच्छेदनासाठी आवश्यक मेडिकल किट नसल्याची कारणे पुढे करण्यात आली. अखेर कर्मचारी बोलावण्यासाठी वाहनखर्च व इतर रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मेडिकल किटच्या नावाखालीही पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने उपस्थित तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी या प्रकारामागे ग्रामीण रुग्णालयातील कथित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखाचा गैरफायदा घेत आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक योगेश मते, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, सुभाष शिंदे, राजू शेख, विजय भास्कर औटी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव औटी, विजय डोळ, राजेंद्र शेरकर, सतीश म्हस्के, राहुल बुगे, अक्षय औटी, किरण चौधरी, उत्कर्ष ठोकळ, अनिकेत साबळे, ऋतिक गायकवाड, शुभम जगताप, योगेश व्यवहारे, गणेश गजभिव, राहुल चौरे, शशीकांत औटी, जुनेद राजे, गौरव श्रीमंदीलकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाची माहिती मिळताच खासदार नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. मृतांच्या नातेवाईकांवर अशा प्रकारे आर्थिक अन्याय होणे अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा :  मळगंगा देवीच्या यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण

खुर्चीला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांनी स्वतः रुग्णालयात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. मात्र, डॉ. लोंढे यांनी फोनवरून चर्चा करत संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने आपण पारनेरला येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. लोंढे यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन केले. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ