- जाहिरात -spot_img
breaking news

मध्यस्थी भोवली; एकाची निर्घृण हत्या, तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार, व्यावसायिकाला मारहाण…

दुसरा गंभीर जखमी | अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर-पाथर्डी रस्त्यावरील बारा बाभळी परिसरातील शौर्य हॉटेलमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भिंगार येथील एका 16 वषय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

निलेश गायकवाड याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो त्याचे मित्र सागर धोत्रे आणि निलेश चावरे यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर निलेश चावरे याने बिल भरले आणि सर्वजण काउंटरजवळ उभे राहिले. त्याच वेळी तेथे भिंगार येथील एक अल्पवयीन मुलगा हॉटेल मॅनेजरसोबत पैशाच्या कारणावरून वाद घालत होता. हा वाद मिटवण्यासाठी सागर धोत्रे याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मित्रा कशाला वाद करतो, त्यांचे पैसे देऊन टाक, असे सागर म्हणाला. यावरून संतापलेल्या त्या अल्पवयीन मुलाने सागरला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने स्वतःजवळील चाकू काढून आधी निलेश चावरे याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तोच चाकू सागर धोत्रे याच्या छातीत खुपसला. या हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेला सागर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि बेशुद्ध झाला. जखमी निलेश चावरे याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सागर धोत्रे याला सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार
दरेवाडीतील नराधमाविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील दरेवाडी भागात एका 24 वषय तरुणीला तिचे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जगन बेरड (रा. हरीकृष्ण नगर, दरेवाडी, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डिसेंबर 2023 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत आरोपीने पीडितेच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. आरोपी अजय याने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीला घाबरवून त्याने वेळोवेळी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला.

हे सुद्धा वाचा :  सुदर्शन कोतकरने गाजवले महाराष्ट्र केसरी कुस्तीचे मैदान; हरला पण, मने जिंकली...

पीडित तरुणीने जेव्हा या प्रकाराला विरोध केला, तेव्हा आरोपीने तिला लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. शिवीगाळ केली. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी अजय बेरड याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.

हॉटेलचे बिल भरण्यावरून वाद; तरुणाला चौघांकडून मारहाण
अहिल्यानगर: शहर परिसरातील भिंगार येथील एका हॉटेलबाहेर बिल भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात हातातील कड्याने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिकेत रवींद्र भिंगारदिवे हे आपल्या मित्रांसह नगर-पाथड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर आणि हॉटेलचे बिल भरून ते सर्वजण बाहेर आले. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी, तुमची बिल भरायची लायकी नाही, असे म्हणून फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी अक्षय अर्जुन उबाळे, संदीप सिद्धार्थ उबाळे, योगेश सुमोथ उबाळे आणि ओंकार छत्रेकर यांनी फिर्यादी अनिकेत आणि त्यांचा मित्र प्रकाश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आरोपींनी अनिकेत यांच्या डोक्यात हातातील कड्याने प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा मित्र प्रकाश यालाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.

व्हॉट्सॲप ग्रुपवर कुत्र्याबाबत मॅसेज टाकल्याने व्यावसायिकाला मारहाण
अहिल्यानगर ः शहरातील तारकपूर भागातील सिंधी कॉलनीमध्ये एका व्हॉट्सप ग्रुपवर पिसाळलेल्या कुत्र्याबाबत सतर्कतेचा मेसेज टाकल्याच्या कारणावरून एका बांधकाम व्यावसायिकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी अशोक कुकरेजा या 33 वषय बांधकाम व्यावसायिकाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकरेजा यांनी त्यांच्या प्रभागातील सिंधी कॉलनी प्रभाग क्रमांक पाच या व्हॉट्सप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. त्यात त्यांनी परिसरात एक पिसाळलेला कुत्रा फिरत असून सर्वांनी दक्षता घ्यावी, अशी विनंती केली होती. या मेसेजचा राग धरून आरोपी जितू गंभीर, कुणाल गंभीर, सोनू गंभीर आणि चिटू गंभीर यांनी कुकरेजा यांना गाठले. आरोपींनी कुकरेजा यांना लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हातातील कडे आणि कुकरी या हत्यारांनी कुकरेजा यांच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर सपासप वार केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ