आकाशात दुर्मिळ ‘ब्लू मून’ दिसत आहे. या खगोलीय घटनेचा व ग्रहांच्या स्थितीचा राशींवर प्रभाव पडणार आहे.
मकर – नवीन काम सुरू करताना सावधगिरी बाळगा. एखाद्या व्यक्तीवरील अतिविश्वास नुकसानकारक ठरू शकतो.
मेष – ब्लू मूनच्या प्रभावातून तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरीत बढतीची शक्यता असून कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ – कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल. घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यावसायिक भागीदारांशी असलेले संबंध सुधारतील.
मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासाचे योग आहेत, परंतु आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल.
कर्क – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साह व उमेद वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.
सिंह – प्रलंबित कामे मार्गी लागतील. समाजात व कुटुंबात तुमचा प्रभाव राहील. विरोधक तुमच्यासमोर टिकणार नाहीत.
कन्या – आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
तूळ – महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. व्यावसायिकांना नवीन लाभदायक डील मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक -सरकारी कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात यश येईल आणि कार्यक्षेत्रात कौतुक होईल.
धनु – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
कुंभ – जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मानसिक समाधान लाभेल.
मीन – कौटुंबिक कलह मिटतील आणि नशिबाची साथ लाभेल.










