- जाहिरात -spot_img
breaking news

‘जय भीम’ म्हणत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अभिजीत दीपकेने केली मोठी घोषणा; पहा सविस्तर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
अमेरिकेतून ‘जय भीम’चा नारा देत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके भारतासाठी रवाना झाले आहेत. शनिवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचणार असून, त्यानंतर जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन उभारण्याचा त्यांचा मानस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले आहे.

भारतासाठी रवाना होताना अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. “भारतासाठी निघालो आहे. माझे भविष्य मी संविधानाच्या हाती सोपवत आहे. जय भीम,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली असून, दिल्लीतील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिपके यांनी भारतात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम दिल्लीतील पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे सांगितले आहे. जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मागण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून कोणतीही परवानगी मिळालेली नसली तरी त्यांनी आपल्या समर्थकांना आणि पक्षाच्या नोंदणीकृत सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा दावा दिपके यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हजारो लोक दिल्लीत जमणार असल्याचे सांगितले. तसेच, पक्षाचे 11 लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

कॉकरोच जनता पार्टी आणि तिच्या नेत्यांच्या मते, हे आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आहे. नीट (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि सीबीएसईच्या निकाल प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सोशल मीडियावरील एका उपरोधिक मोहिमेतून झाली होती. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भातून ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव चर्चेत आले. सुरुवातीला विनोद म्हणून सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच या पेजचे फॉलोअर्स प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा :  धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानचे राजकीय कनेक्शन उघड; धक्कादायक अपडेट समोर

आता ही ऑनलाइन चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न सुरू असून, अभिजीत दिपके यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आणि प्रस्तावित आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासनाची भूमिका काय राहते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

‘अभिजीत दिपकेंना जर अटक केली तर ४२ दिवसांच्या उपोषणावर जाणार’, सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीवर उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी गमतीने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने पाहता पाहता मोठे रूप घेतले. सोशल मीडियावर त्यांना भारतातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक असा पाठिंबा मिळाला. त्यानंतर आता या व्हर्च्युअल पक्षाने दिल्लीतील जंतर मंतर येथील मैदानात आपल्या पहिल्या आंदोलनाची हाक दिली.

तत्पूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. साध्या वेशातील काही पोलिसांनी दिपके यांना अज्ञातस्थळी नेल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी इशारा दिला की, जर अभिजीत दिपके आणि पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला अटक झाली तर ते ४२ दिवसांच्या उपोषणाला बसतील. सोनम वांगचुक यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. याबरोबर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “शनिवारी मी तुम्हा सर्वांना भेटायला लडाखहून दिल्लीला भेटायला येत आहे. जंतर मंतरवर तुमची भेट घेईन. तथापि, जर उद्या कोणत्याही कारणास्तव तुम्हाला अटक झाली, तर मला एक असे पाऊल उचलण्यास भाग पडेल, जे उचलण्याची माझी इच्छा नाही. जर कुणाचीही अटक झाली तर मी यावेळी सहा आठवड्यांसाठी म्हणजेच ४२ दिवसांसाठी उपोषणावर जाईल.”

दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला गेला आहे. पोलिसांनी जंतर मंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.

अभिजीत दिपकेंच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचे कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवर जाहीर करण्यात आले आहे. सर्व आंदोलकांनी आता थेट जंतर मंतरवर भेटावे, असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  खर्ग बेटाजवळ तेलगळती !

शांततेत आंदोलन करण्याचे दिपकेंचे आवाहन
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक ३० वर्षीय अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून भारतात परतले. आपले आंदोलन शांततेने आणि प्रेमाने करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिपके म्हणाले, मी भारतात आलो आहे. आपण लवकरच भेटू. आपल्या हातात तिरंगा आणि पुस्तक घेऊन यायला विसरू नका. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना फूल द्या आणि त्यांचे कौतुक करा. आपल्याला ही चळवळ शांततेने आणि प्रेमाने पुढे न्यायची आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ