- जाहिरात -spot_img
breaking news

श्रीरामपूरमध्ये रामनवमी मिरवणुकीला गालबोट; दगडफेकीत तिघे जखमी… काय घडलं पहा

श्रीरामपूर / नगर सह्याद्री –
शहरातील गोंधवणी रोड परिसरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग सुभाष झिरंगे (वय 34, रा. झिरंगे वस्ती, गोंधवणी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनवणे यांच्या वतीने महादेव मंदिर, गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक दुपारी सुमारे 12.30 वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोडमार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गे पुढे जात सय्यदबाबा चौक येथे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली.

याठिकाणी काही अनोळखी 10 ते 12 तरुणांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला. या दगडफेकीत सुयोग झिरंगे यांच्या डोक्याला दगड लागून सूज आली आहे. तसेच किरण राजेंद्र लबडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून, यश राजेंद्र गोराणे यांच्या डाव्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 190(1), 191(1), 191(2), 192, 110, 118(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  शेवगावात इंधन दरवाढीविरोधात भाकपचे आंदोलन..सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ