- जाहिरात -spot_img
breaking news

उन्हाळी आवर्तनच्या कालावधीत कुकडी कालवा परिसरात निर्बंध… काय कारण

पारनेर | नगर सह्याद्री
कुकडी डावा कालवा परिसरात उन्हाळी हंगामातील आवर्तन अडथळा न येता सुरळीतपणे पार पडावे, यासाठी प्रशासनाने पारनेर-श्रीगोंदा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कुकडी डावा कालवा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उन्हाळी हंगामातील दुसऱ्या आवर्तनच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे कालव्याच्या परिसरात अनधिकृत हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून पाणी वितरणात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
आदेशानुसार कुकडी डावा कालव्याच्या कि.मी. 110 ते 165 या टप्प्यातील कालव्यालगतचा परिसर तसेच संबंधित वितरिकांच्या चोहोबाजूस 100 मीटर अंतरापर्यंतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात सक्षम अधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी राहणार नाही. संबंधित परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहनाने, पायी अथवा अन्य कोणत्याही मार्गाने फिरणे, थांबणे किंवा समूहाने वावरणे यास मनाई करण्यात आली आहे. कालव्याच्या पाणी व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कालव्यालगतच्या परिसरातील नागरिक, शेतकरी आणि इतर संबंधितांनी आदेशांची दखल घेऊन आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ