- जाहिरात -spot_img
breaking news

केडगावमध्ये दुकान फोडले, सोशल मीडियावर बदनामी भोवली, नंबर मागितल्याने मारहाण…

५० हजार रुपयांची रोकड लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील केडगाव परिसरातील नगर-पुणे रस्त्यावर असलेले बालाजी टायर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून फोडले. चोरट्यांनी दुकानाच्या काउंटरमधील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन दादाभाऊ कोतकर (वय ४०, रा. गणेश अपार्टमेंट, एकनाथनगर, केडगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतकर यांचे रंगोली चौकात टायर्स विक्रीचे दुकान आहे. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांनी दुकान उघडले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे कशाच्या तरी साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील काउंटरचे ड्रॉवर तोडून त्यामध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड (१०० रुपयांच्या ५०० नोटा) लंपास केली. दुकानातील इतर सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कोतकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस अमलदार करीत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाईल नंबर मागितल्याने मारहाण
अहिल्यानगर – गांधी मैदान चौक परिसरात मोबाईल नंबर मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तनवीर गुलाम हुसेन शेख (वय ३८, रा. आनंदीबाजार) हे गांधी मैदान परिसरातून पायी जात होते.

यावेळी त्यांनी तेथे असलेल्या ऋषीकेश नावाच्या तरुणाकडे त्याच्या मालकाचा मोबाईल नंबर मागितला. याचा राग आल्याने ऋषीकेश याने तनवीर यांच्याशी हुज्जत घालून त्यांची गचंडी पकडली. नंतर ऋषीकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या पुंड नावाच्या व्यक्तीने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनीही तनवीर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तनवीर शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पुंड आणि ऋषीकेश यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  संत शेख महंमद महाराज देवस्थानची वक्फ नोंदणी रद्द करण्याचे आदेश

सोशल मीडियावर महिलेची बदनामी भोवली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय खेमनर यांचे एकांतातील खाजगी फोटो फेसबुकवर सार्वजनिक करून त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी जय ओबीसी नावाचे फेसबुक पेज आणि हर्षवर्धन बारवकर या फेसबुक खातेधारकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि दत्तात्रय खेमनर यांनी संमतीने काढलेले खाजगी फोटो या फेसबुक पेजेस आणि खात्यावरून अनधिकृतपणे प्रसारित करण्यात आले. २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.आपली बदनामी करण्याच्या आणि एकांतपणाचा भंग करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा गैरवापर करणार्‍यांविरुद्ध सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे स्वतः करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ