- जाहिरात -spot_img
breaking news

नमो किसान सन्‍मान योजनेचा हप्ता खात्यावर, जिल्‍हयातील शेतक-यांच्‍या १०८ कोटी ५० लाख रुपये…

लोणी / नगर सह्याद्री –
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नमो किसान सन्‍मान योजनेच्या आठव्या हप्त्याचे अनुदान अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार शेतक-यांना मंजूर झाले असून अनूदानापोटी जिल्ह्याला १०८ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांसाठी महायुती सरकारने सुरु केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून, केंद्र सरकारचे वर्षाला ६ हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रूपयांचे अनुदान शेतक-यांच्या थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्‍याने दोन्ही योजनांचा मोठा दिलासा शेतक-यांना मिळत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. राज्यातील महायुती सरकारने या योजनेतील आठव्या हप्त्याच्या अनुदानापोटी १७८९ कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली. त्यामुळे राज्यातील ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

अहिल्यानगर जिल्‍ह्यातील ५ लाख ४२ हजार ५१४ शेतक-यांच्‍या खात्‍यात प्रत्‍येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०८ कोटी ५० लाख रुपये जमा झाले असल्‍याचे सांगून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, राज्य सरकारने नेहमीच शेतकरी हिताचा विचार करून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आतापर्यत विविध योजना तसेच नैसर्गिक संकटापोटी १५ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना झाली असून, नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच मोफत वीज तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांसाठी सुरु केलेल्‍या अनेक योजनांपैकी किसान सन्‍मान तसेच नमो किसान सन्मान योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या ठरल्या असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा लाभ अकोले तालुक्‍यातील ३४ हजार २६२ शेतक-यांना ६ कोटी ८५ लाख, जामखेड २८ हजार ७२६ शेतक-यांना ५ कोटी ७४ लाख, कर्जत ४३ हजार २१४ शेतक-यांना ८ कोटी ६४ लाख , कोपरगाव २९ हजार ३२७ शेतक-यांना ५ कोटी ८६ लाख, अहिल्यानगर ३० हजार ५५७ शेतक-यांना ६ कोटी ११ लाख, नेवासा ५३ हजार ५४६ शेतक-यांना १० कोटी ७० लाख, पारनेर ४९ हजार ६१० शेतक-यांना ९ कोटी ९२ लाख, पाथर्डी ३९ हजार ४९५ शेतक-यांना ७ कोटी ८९ लाख, राहाता २३ हजार ७२९ शेतक-यांना ४ कोटी ७४ लाख, राहुरी ३८ हजार १४६ शेतक-यांना ७ कोटी ६२ लाख, संगमनेर ५८ हजार ४८६ शेतक-यांना ११ कोटी ६९ लाख, शेवगाव ४१ हजार ४४४ शेतक-यांना ८ कोटी २८ लाख, श्रीगोंदा ४९ हजार ९३४ शेतक-यांना ९ कोटी ९८ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३८ शेतक-यांना ४ कोटी ४० लाख रुपये. अशा रक्‍कमा तालुका निहाय शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग झाल्‍या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोऱ्या; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ