- जाहिरात -spot_img
breaking news

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपार्ई द्या; पारनेरमध्ये शिवसेनेचा मोर्चा, काय आहेत मागण्या…

पारनेर | नगर सह्याद्री

अलीकडेच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने उभ्या पिकांचा खर्च निघणेही कठीण झाले असून, या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केले. अध्यक्षस्थानी शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे होते. मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना तातडीने मिळावी, घसरलेल्या बाजारभावाचा विचार करून कांद्याला प्रति किलो १० रुपये अनुदान जाहीर करावे आणि तालुयातील गॅस एजन्सींकडून ग्राहकांची होणारी आर्थिक लूट प्रशासनाने तत्काळ थांबवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पारनेर तालुयात पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रामुख्याने आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, याच बैठकीत तालुयातील शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांनी लक्ष वेधून घेतले. यानंतर पारनेर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.

उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्कर शिरोळे, पोपट चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, मा. तालुकाप्रमुख गुलाब नवले, शहर प्रमुख निलेश खोडदे, जिल्हा समन्वयक सखाराम उजघरे, संतोष येवले, अर्जुन आढाव, नितीन आहेर, संदीप मोढवे, कैलास ढोमे, राजू शेख, सुनीता मुळे, किसनराव चौधरी, युवासेना तालुका संघटक आदिनाथ कदम, शिवसेना समन्वयक मंगेश पाटील सालके, शिवसेना संघटक अमोल गजरे, सहसंघटक किरण सुपेकर, गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, संतोष साबळे, मोहन परांडे, मनोज व्यवहारे, ढवळपुरी येथील आयुब शेख, अंबर पवार, सरपंच रामदास खोसे, सरपंच साहेबराव खरात, सोशल मीडियाप्रमुख राहुल मोरे, चेअरमन संतोष लामखडे, सरपंच अशोक पंडित, शाखाप्रमुख शरद जगदाळे, कामरगाव येथील राजेंद्र लाळगे, अतुल मुळे, सुयोग टेकूडे, शुभम पाडळे, शिवाजी लाळगे, सुभाष भोसले, पारनेर सोसायटी चेअरमन सतीश औटी, शाखाप्रमुख सुनील आरोटे, संपत खोडदे, अक्षय बेलोटे, लहू गाडगे, प्रशांत पठारे, विशाल पठारे, नितीन खोडदे, सुहास व्यवहारे, सुरेश बुचुडे, पप्पू गाडगे, पप्पू शिंदे, बंडू मोरे, कुसुमताई मुळे, गोरख औटी, मंगेश जाधव, अजय साळवे, ग्रामपंचायत सदस्य सागर मते, आदित्य महांडुळे, रंगनाथ मुळे, राजू पथवे, संतोष केदारी, धनंजय पोटघन, मंगेश खणकर, प्रकाश ठुबे, संकेत ढोकळे, प्रमोद शिंदे, पांडुरंग सुपेकर, निलेश वरखडे, अरविंद जाधव, ज्ञानदेव सुंबे, दीपक घावटे, रमेश रासकर, बाळासाहेब खोसे, ऋषिकेश माने व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  डॉ. शिवाजी ठुबे यांना युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान.... नवी दिल्लीत सोहळा

..तर शिवसेना स्टाईलने आंदोलन
या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जर येत्या दहा दिवसांत सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही, तर ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे तालुयात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

जिल्हाप्रमुखांच्या पदाधिकार्‍यांना सूचना
पारनेर येथे शिवसेनेची पदाधिकारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये शिवसैनिकांमध्ये ऊर्जितावस्था आणण्यासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांच्या संघटनात्मक टीमला काही सूचना केल्या. तालुयात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद आजही कायम असून ही ताकद अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अस आवाहने जिल्हाप्रमुख दळवी यांनी केले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ