- जाहिरात -spot_img
breaking news

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी
मुख्यमंत्रा फडणवीस यांची घोषणा

सातारा/ नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2-3 रुपये किलोने विकावा लागत आहे. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

साताऱ्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कांदा विकत घ्या; अशी विनंती मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या संकट राज्य सरकार दूर करेल असा शब्द देतो. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना पोहोच राशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून देणार आहोत अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की, भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र दोन्हीकडे कमळ उगवले आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर दिले जाईल हा पंतप्रधानांचा मानस आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याच राज्याला 30 लाख खरं मिळाली नव्हती, मात्र महाराष्ट्राला 30 लाख घर मिळाले आहेत असं सांगताना कांद्याची खरेदी 12 रुपये 35 पैसे किमतीने सुरू केली जाईल अशी माहिती दिली आहे.

उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल केवळ सहाशे ते सातशे रुपये इतकाच दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये प्रतिक्विंटल 1500 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा :  मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, सरकारला दिला हा इशारा, 'या' आहेत मागण्या?
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ