- जाहिरात -spot_img
breaking news

…उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, काय म्हणाले पहा

बारामती / नगर सह्याद्री –
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. जय पवार यांनी या अहवालावर असमाधान व्यक्त केले आहे. हा अहवाल अतिशय वरवरचा आणि अपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एआयबीने (AIB) तयार केलेला प्राथमिक अहवाल वाचला आहे. हा अहवाल वाचल्यानंतर अत्यंत खेद आणि वेदना झाल्या आहेत. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोल अभ्यास करून तयार करण्यात आलेला नाही. केवळ औपचारिक माहिती देऊन हा विषय संपवू नये. महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या कुटुंबांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांना सत्य आणि पारदर्शक उत्तर मिळालेच पाहिजे, असे जय पवार म्हणाले.

जय पवार नेमकं काय म्हणालेत?
एएआयबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत. DGCA ने ज्या मुद्द्यावर VSR Ventures ची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यावर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.

जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लोटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करायला हवा.

हे सुद्धा वाचा :  महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून हल्लाबोल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ