- जाहिरात -spot_img
breaking news

आता उशिरा याला तर याद राखा; उपमहापौर धनंजय जाधव यांनी काय दिला इशारा…

उशिरा आल्यास कठोर कारवाई / महापालिकेच्या लेटलतीफ कर्मचार्‍यांना उपमहापौर धनंजय जाधव यांचा इशारा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी सकाळी १० वाजता अचानक भेट देत गेटवर उभे राहून अधिकारी व कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. अचानक झालेल्या या तपासणीमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.

उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांनी थेट जाब विचारत पुन्हा उशीर झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. महापालिकेच्या कामकाजात शिस्त राखणेअत्यंत गरजेचे असून नागरिकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.यावेळी अ‍ॅड. धनंजय जाधव म्हणाले की, महापालिका ही केवळ नोकरी करण्याचे ठिकाण नाही, तर ती नागरिकांच्या सेवेसाठी असलेली जबाबदारी आहे.

प्रत्येक कर्मचारी हा या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. आपण वेळेवर कामावर आलो नाही, तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या कामांवर होतो. त्यामुळे कामावर एक-दोन तास उशिरा येणे ही गंभीर बाब आहे. ते पुढे म्हणाले, सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा या वेळेत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियमित उपस्थित राहून आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. नागरिकांना त्यांच्या कामासाठी वारंवार फेर्‍या माराव्या लागतात, ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वेळेचे भान ठेवून जबाबदारीने काम केल्यास महापालिकेची प्रतिमा उंचावेल.

महापालिकेबद्दल आपले कर्तव्य ओळखा. नागरिकांना चांगली, जलद आणि पारदर्शक सेवा देणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. यापुढे कोणताही कर्मचारी विनाकारण उशिरा येताना आढळल्यास त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा :  बोल्हेगाव परिसरात सहा दारू अड्ड्यांवर छापेमारी; भांडण सोडविणे भोवले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ