- जाहिरात -spot_img
breaking news

महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, ६० कोटींचा गैरव्यवहार उघड, कुठे घडला प्रकार पहा…

कोल्हापूर / नगर सह्याद्री –
कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६० कोटी ७५ लाख रुपयांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धर्मादाय कार्यालयाच्या तत्कालीन निरीक्षण अधिकारी रागिणी खडके, रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्टचा धनादेश बेकायदेशीररित्या हस्तांतरित करणे आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी संशयित धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंबरलाल खडके यांना काही दिवसांपूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवाच्या ट्रस्टमध्ये एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा :  उष्णता वाढली; लवकरच पावसाची एन्ट्री, कोकणात कधी येणार पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ