- जाहिरात -spot_img
breaking news

सभापती राम शिंदे यांची तनपुरेंसोबत गुप्त चर्चा ; चर्चांना उधाण

राहुरी | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असताना प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या बैठकीला माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी जिल्हा बँकेची निवडणूक, सहकार क्षेत्रातील बदलती राजकीय समीकरणे आणि आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ना. विखे, शिंदे यांचे गट सक्रिय
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांची ही भेट आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  महिलेवर अत्याचार; त्रासाला कंटाळून पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, बकऱ्यांच्या पैशांवरून वाद; पती-पत्नीला बेदम मारहाण...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ