- जाहिरात -spot_img
breaking news

सोने आणि चांदीचे भाव घसरले

पंतप्रधान मोदी यांचे आवाहन अन ..
सोने आणि चांदीचे भाव घसरले

मुंबई /नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी 1 वर्षासाठी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले. नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन करताच त्याचे पडसाद सराफा व्यापारात बघायला मिळाले. हेच नाही तर सोन्याच्या दरात घसरण देखील झाली. सोन्यासोबतच चांदीचेही भाव घसरले आहेत. परकिय चलन वाचवण्याकरिता हे आवाहन करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात असतानाही भारतात सोन्याची मोठी खरेदी होत आहे. त्याचा परिणाम परकिय चलनावर होत आहे.
आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा 24 कॅरेटचा दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना मोठे आवाहन करत सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनानंतर सोन्याच्या दरात 800 रुपयांनी घसरण झाली. पुढील काही दिवसात सोन्याचे दर आणखीन घसरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. युद्धादरम्यान सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र, यादरम्यानच भारतात सोन्याची मागणी चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, यामुळे व्यापारात तुट निर्माण होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या भावात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा :  सोन खरेदी करताय, आजचा बाजार भाव पहा, मोठी वाढ
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ