- जाहिरात -spot_img
breaking news

२९ लाखांचा धनादेश बाऊन्स; आरोपीस ६ महिन्यांची कैद, पारनेरच्या आरोपीला कारावास

शेअर मार्केट नफ्याच्या व्यवहारातील चेक अनादर प्रकरणात शिक्षा / महिनाभरात ३३.७८ लाख रुपये भरण्याचे निर्देश
पारनेर / नगर सह्याद्री –
धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अहिल्यानगर येथील न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांच्या कारावासाची तसेच ३३ लाख ७८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा परक्राम्य संलेख अधिनियम (Negotiable Instruments Act) कलम १३८ अंतर्गत देण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर येथील प्रविण मच्छिंद्र पठारे यांनी आरोपी अमोल सिताराम थोरात (रा. पारनेर) याच्याविरुद्ध अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, शेअर मार्केटमधील नफ्याच्या मोबदल्यात आरोपीने त्यांना २९ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो वटला नसल्याने फिर्यादींना रक्कम मिळाली नव्हती.

याप्रकरणी फिर्यादींनी न्यायालयात परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये दावा दाखल केला. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांच्या न्यायालयासमोर झाली. सुनावणीदरम्यान फिर्यादींचा जबाब नोंदविण्यात आला. तसेच आवश्यक कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचा आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले.

फिर्यादींच्या वतीने अॅड. अजित प्रतापराव रोकडे यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी अमोल थोरात याला दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून ३३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा द्रव्यदंडही ठोठावला आहे.
तसेच, न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे की, आरोपीने एक महिन्याच्या आत दंडाची रक्कम जमा न केल्यास त्याला अतिरिक्त सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. याशिवाय, दंडाची संपूर्ण रक्कम नुकसानभरपाई (कॉम्पेन्सेशन) म्हणून फिर्यादी प्रविण पठारे यांना एक महिन्याच्या आत अदा करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा :  गुढीपाडव्यानिमित्त रसिक ग्रुपची गीत, नृत्य व विनोदाची सुरेल मेजवानी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ