- जाहिरात -spot_img
breaking news

जिल्हा बँक राजकारण तापले : ठरावापूर्वी दोन संचालक बेपत्ता; अपहरणाचा आरोप

जिल्हा बँक राजकारण तापले : ठरावापूर्वी दोन संचालक बेपत्ता; अपहरणाचा आरोप

पाडळी रांजणगावातील सोसायटीच्या राजकारणाला नवे वळण; पाच जणांविरुद्ध सुपा पोलिसांत तक्रार

पारनेर / नगर सह्याद्री –

तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील जय हनुमान विविध कार्यकारी सोसायटीच्या दोन संचालकांचे अपहरण झाल्याची गंभीर तक्रार सुपा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

याबाबत किरण सुदाम साठे (वय 40, रा. पाडळी रांजणगाव) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील सुदाम आनंदा साठे (वय 70) हे जय हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक असून ते दररोज सायंकाळी दर्यामाता मंदिरात आरतीसाठी जातात. 7 जुलै रोजी सायंकाळी ते मंदिरात गेले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, परंतु ते आढळून आले नाहीत.

दरम्यान, सोसायटीचे दुसरे संचालक कांतीलाल नामदेव उबाळे (वय 67) हे देखील त्याच रात्रीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. फिर्यादीने कांतीलाल उबाळे यांचे पुत्र नितीन उबाळे यांच्याकडे चौकशी केली असता, काही दिवसांपूर्वी विरोधी गटातील व्यक्तींनी जिल्हा बँकेच्या ठरावाच्या बैठकीस उपस्थित राहू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याची माहिती मिळाली.

फिर्यादीनुसार, जय हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचा जिल्हा बँकेसंदर्भातील महत्त्वाचा ठराव 10 जुलै रोजी होणार आहे. या ठरावासाठी संबंधित संचालक उपस्थित राहू नयेत, या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कांतीलाल उबाळे यांच्या मुलीला पुण्यात अज्ञात व्यक्तीकडून फोन करून दोन्ही संचालकांचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात गणेश एकनाथ करंजुळे, दीपक अशोक करंजुले, गोरख नारायण उबाळे, अजित भाऊसाहेब उबाळे आणि प्रद्युम्न गुलाब करंजुले (सर्व रा. पाडळी रांजणगाव) यांच्याविरोधात अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला असून सुपा पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार; जिल्ह्यातील प्रत्येक वादात ‘तो’च लोकप्रतिनिधी का दिसतो?, सुजय विखे काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ