- जाहिरात -spot_img
breaking news

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

गोशाळेतील जनावरांची परस्पर लावली विल्हेवाट
पोलिसांकडून पाच आरोपींवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
लक्ष्मीमाता गोशाळेत संगोपनासाठी ठेवलेल्या म्हशींची न्यायालयाच्या आदेशाशिवाय परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन जनावरांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळवाडी परिसरातील वाळकी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास संशयास्पद वाहने आढळून आली. पोलीस कर्मचारी विजय दशरथ साठे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोशाळा चालक चांगदेव गोरख भालसिंग याने आरोपी नितेश बबन वैरागर आणि शरद जगन्नाथ आल्हाट यांच्याशी आर्थिक हितसंबंधांतून हातमिळवणी केली. तपासी अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, तब्बल 20 हजार रुपये घेऊन जनावरे परस्पर सोपवली.
हा प्रकार पुढे नेण्यासाठी चालक अमोल दशरथ कासार आणि शरद गुलाब साठे यांना पिकअप वाहनांसह बोलावण्यात आले. या सर्वांनी संगनमत करून मोठ्या आणि लहान आकाराची एकूण 12 म्हैस वगय जनावरे दोन वाहनांमध्ये कोंबले. जनावरांना अत्यंत दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने बांधून घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी दोन लाख रुपये किमतीच्या दोन पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या आणि 1 लाख 80 हजार रुपये किमतीची जनावरे असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सायबर भामट्याचा तरुणाला 10 लाखांना गंडा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने तरुणाच्या बँक खात्यांवर डल्ला मारत तब्बल 10 लाख 2 हजार 779 रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुण श्रीराम संजय बांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हे सुद्धा वाचा :  रेशन दुकानातील गहू , तांदुळावर चोरट्यांचा डल्ला .... राहुरीतील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम बांगर हे पाथड तालुक्यातील लोहसर येथील रहिवासी असून ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. गेल्या शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या तीन वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमधून पैसे काढून घेतले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यांचा समावेश आहे.

चोराने युपीआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटांत ही सर्व रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली. खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. श्रीराम बांगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सून, मुलाने चोरले वडिलांचे पैसे, सोने
अहिल्यानगर –
घरातील अंतर्गत वादातून मुलाने आणि सुनेनेच स्वतःच्या वडिलांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज चोरून नेल्याची घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेऊरबायजाबाई येथील रहिवासी लक्ष्मण जयवंत बनकर (वय 55 वर्षे, व्यवसाय-शेती) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. लक्ष्मण बनकर हे घराबाहेर गेलेले असताना, त्यांचा मुलगा प्रशांत लक्ष्मण बनकर आणि सून चित्रा प्रशांत बनकर या दोघांनी मिळून ही चोरी केली. दोघांनी लक्ष्मण यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील कपाटाचे लॉकर उघडून त्यात ठेवलेले 15 हजार रुपये रोख आणि 30 हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी, असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चिमुरडीचा मृत्यू; चार जणांवर गुन्हा
अहिल्यानगर: शहरातील आनंदनगर भागात महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. खेळत असताना रस्त्यावरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने या चिमुरडीचा जागीच शॉक लागून मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या अभियंत्यासह चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भास्कर सिताराम कोळे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विद्युत ठेकेदार श्री. झगडे (मे. तनिष्का), वरिष्ठ तंत्रज्ञ शरद काकडे, विद्युत सहाय्यक स्वप्नील ईश्वरकर आणि सहाय्यक अभियंता विनोद पांढरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ