- जाहिरात -spot_img
breaking news

संगमनेर मर्चंट बँकेची एक हजार कोटींची उद्दिष्टपूर्ती हा ऐतिहासिक क्षण : राजेश मालपाणी

संगमनेर मर्चंट बँकेचा हीरक महोत्सव; कर्मचारी, अधिकाऱ्यांचा पारितोषिकांनी गौरव

संगमनेर | नगर सह्याद्री
हीरक महोत्सवी वर्षांमध्ये संगमनेर मर्चंट बँकेने ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर एक हजार कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार करून जिल्ह्यातील सहकारी बँकिंगच्या इतिहासात एक सोन्याचे पान लिहिले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे मानकरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक आणि कार्यक्षम कर्मचारी, अधिकारी हे आहेत, असे गौरवोद्गार बँकेचे चेअरमन उद्योगपती राजेश मालपाणी यांनी काढले.

1966 साली स्थापन झालेल्या बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारोप सोहळ्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हीरक महोत्सवी वर्षाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्हा.चेअरमन मधुसूदन नावंदर, तसेच विद्यमान चेअरमन सीए संजय राठी, व्हा.चेअरमन रवींद्र पवार, सीए प्रशांत रुणवाल, स्टाफ कमिटी चेअरमन संतोष करवा व बँकेचे सीईओ राजेंद्र सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन सीए संजय राठी यांनी संगमनेर मर्चंट बँकेने 60 वर्षात केलेली खरी कमाई म्हणजे ग्राहकांचा विश्वास असून ठेवींची सुरक्षितता, पारदर्शकता आणि गोपनीयता यापुढेही काटेकोरपणे पाळली जाईल आणि सर्वांच्या मदतीने प्रगतीचा हा रथ असाच वेगाने पुढे जात राहील, असा मला विश्वास असल्याचे म्हणाले. हीरक महोत्सवी वर्षात विशेष चमक दाखविणारे राहुरी शाखेचे व्यवस्थापक राका, तब्बल 106 वेळा नजरचुकीने जास्त आलेले पैसे गाहकांना परत करणाऱ्या महिला कर्मचारी सुनीता पडवळ, तुषार खांडरे. निलेश शेणकर, राकेश गुंजाळ, आयटी मॅनेजर विठ्ठल कुलकर्णी यांना गौरव चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संगमनेर मर्चन्ट बँकेतील स्टाफ सहकाऱ्यांना भरघोस भेट जाहीर करण्यात आली. कार्यकम चालू असतानाच भेटीची रक्कम स्टाफच्या खात्यात जमा करण्यात आली. व्याख्याते सीए रुणवाल यांनी ‌‘कीप इट सिम्पल‌’ नावाचा सकारात्मक विचारधारेची जोपासना करण्याचे हसतखेळत मार्गदर्शन करणारा सुंदर कार्यकम सादर केला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकमाचे प्रास्ताविक संतोष करवा यांनी, सूत्रसंचालन प्रकाश राठी यांनी तर आभार प्रदर्शन मावळते व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनी केले. बँकेचे कर्मचारी, अधिकारी सहकुटुंब सहपरिवार या कार्यकमासाठी आवर्जून उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर ; 23 एप्रिलला मतदानतर 4 मे ला मतमोजणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ