- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपयांचा भाव; आवक किती पहा…

पारनेर | नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी (दि. 3 जुलै) कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दिवसभरात 17 हजार 400 गोण्यांची आवक झाली असून 12 हजार 332 क्विंटल कांद्याची विक्री झाली. बाजारात कांद्याला किमान 500 रुपये तर कमाल 2,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

बाजार समितीच्या माहितीनुसार, गावरान कांद्याच्या नंबर एक प्रतीला 2,200 ते 2,500 रुपये, नंबर दोनला 1,900 ते 2,100 रुपये, नंबर तीनला 1,300 ते 1,800 रुपये, नंबर चारला 500 ते 1,200 रुपये, तर गोळी/गिरटा प्रकारच्या कांद्याला 1,300 ते 1,900 रुपये असा बाजारभाव मिळाला. तसेच अपवादात्मक दर्जाच्या 78 गोण्यांना 2,600 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाल्याची नोंद झाली. याशिवाय, 2,401 ते 2,500 रुपये दरम्यान 7096 गोण्या, 2,301 ते 2,400 रुपये दरम्यान 2917 गोण्या, 2,201 ते 2,300 रुपये दरम्यान 3187 गोण्या, 2,101 ते 2,200 रुपये दरम्यान 3705 गोण्या, 2,001 ते 2,100 रुपये दरम्यान 2635 गोण्या, 1,901 ते 2,000 रुपये दरम्यान 2065 गोण्या, 801 ते 1,900 रुपये दरम्यान 1239 गोण्या, तर 500 ते 800 रुपये दरम्यान 1126 गोण्यांची विक्री झाली.पारनेर तालुका व परिसरात सध्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून बाजार समितीतही दररोज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला बाजार उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, उपसभापती संदीप सालके, माजी सभापती बाबाजी तरटे आणि सचिव सुरेश आढाव यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
पारनेरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरत आहे. पारनेर व परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला स्पर्धात्मक आणि योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. पारदर्शक लिलाव प्रक्रिया, व्यापाऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि शेतकरीहिताचे निर्णय यामुळे पारनेर बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
– गंगाराम बेलकर
(सभापती, बाजार समिती, पारनेर)

हे सुद्धा वाचा :  जिल्ह्यात जिहादी भोंदू डॉक्टरांचा बोगस वैद्यकीय कारभार; आमदार जगताप काय म्हणाले पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ