- जाहिरात -spot_img
breaking news

गायरान जमिनीवरून दोन कुटुंबांत वाद ; पवार कुटुंबाचे उपोषण सुरू

गुन्हा दाखल होऊनही न्याय मिळत नसल्याने आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील पोखरी येथे गायरान जमिनीत केलेल्या अतिक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी दोन पवार कुटुंबीयांत झालेल्या वादाचे पर्यावसान गंभीर गुन्ह्यात झाले आहे.

या प्रकरणातील आरोपींवर पारनेर पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी पीडित पवार कुटुंबाने सोमवार (दि. 29 जून) पासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

पोखरी येथील रहिवासी रावसाहेब कुंडलीक पवार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, गावांमधील गावठाण गट क्रमांक 19 मधील गायरान जागेच्या ताब्यावरून दोन कुटुंबांमध्ये जुना वाद आहे. याच वादातून दि. 29 मे रोजी आरोपी शिवम पवार, प्रवीण पवार, अक्षय पवार, राजू पवार, अमोल पवार, मंदाबाई पवार व अलका पवार यांनी पूर्वनियोजित कट रचून रावसाहेब पवार यांच्या संतोष पवार या भावावर जीवघेणा हल्ला केला.या बेदम मारहाणीत त्यांच्या भावाच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
गुन्हा दाखल होऊनही पोलीस आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर पवार कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले. रावसाहेब पवार, संतोष पवार, सार्थक पवार, रोहिणी पवार, सविता पवार, मीरा पवार हे कुटुंबीय सोमवार, 29 जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहे. संबंधित पीडित कुटुंबाला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वादावर प्रशासनाची भूमिका बघ्याची !
पोखरी येथील गावठाणातील गायरान जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी दोन पवार कुटुंबीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली यामध्ये परस्पर गुन्हे सुद्धा दाखल झाले. परंतु रावसाहेब पवार यांनी प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कुटुंबीयांसह ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. पोखरीतील गावठाणामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यावरून इतर कुटुंबीयांमध्ये स्थानिक वाद सुरू आहेत. या सर्व प्रकारावर प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे.

हे सुद्धा वाचा :  शिक्षक बीएलओ कामावर, शिक्षण वाऱ्यावर ! मराठी शाळांच्या अस्तित्वावरच घाला?

ताबा सोडण्यास स्थानिकांचा नकार
उपोषणकर्ते रावसाहेब पवार यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, याचबरोबर गट नंबर 19 मधील गायरान क्षेत्रावर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून ती जमीन शासनाला मिळावी, अशी सुद्धा मागणी केली आहे. तसेच पोखरी येथील गावठाणात गायरान (सरकारी) क्षेत्रावर जवळपास 150 ते 200 कुटुंबीय राहतात. रस्त्यालगत गायरान जमीन मिळावी, यासाठी स्थानिक कुटुंबांमध्ये अनेक वर्षापासून वाद आहेत. यापूव शासनाने संबंधित कुटुंबीयांना नोटीस पाठवल्या आहेत. तरीही ताबा सोडण्यास स्थानिक लोक तयार नाहीत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ