- जाहिरात -spot_img
breaking news

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ३३४.९८ कोटींच्या मदत, अहिल्यानगरला मिळाला ‘इतका’ निधी…

मुंबई / नगर सह्याद्री –
मार्च, एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

राज्यातील कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि शेती पुनर्बांधणीला बळ मिळावे, या भूमिकेतून मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय मार्गी लागला आहे.

राज्यातील दोन लाख ६७ हजार ६५६ शेतकरी आणि एक लाख ६३ हजार ७८८.७५ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून, त्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ३,७६२ शेतकऱ्यांना २,२४१.३० हेक्टर क्षेत्रासाठी चार कोटी ३१ लाख एक हजार रुपये.

अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील एकूण १३,५२८ शेतकऱ्यांना ७,५४५.९४ हेक्टर क्षेत्रासाठी १९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४,६१३ शेतकऱ्यांना ८,१६०.५३ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील २,५०६ शेतकऱ्यांना १,९२३.२० हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी दोन लाख ७९ हजार रुपये.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एक लाख दोन हजार ८९६ शेतकऱ्यांना ५५ हजार ५५५.९० हेक्टर क्षेत्रासाठी १०३ कोटी ३२ लाख ७७ हजार रुपये. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एक लाख ३६ हजार ७५१ शेतकऱ्यांना ९२ हजार ३६२.७८ हेक्टर क्षेत्रासाठी २०९ कोटी १० लाख सहा हजार रुपये मंजूर केले आहेत. राज्यातील शेतकरी संकटातून सावरण्यासाठी शासनस्तरावर ही तातडीची कार्यवाही करण्यात आली आहे.

जिल्ह्याला 21 कोटी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई
21 हजार 495 शेतकऱ्यांना मिळणार मदत | गेल्यावष पावसाने शेतपिकांचे नुकसान
शिर्डी | नगर सह्याद्री
एप्रिल आणि मे 2026 मध्ये अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने जिल्ह्याला 21 कोटी 30 लाख रुपयांची मदत मंजूर केली असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा :  खुशखबर! मान्सून केरळमध्ये धडकला, दोन दिवसात महाराष्ट्रात...

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सुमारे 12 हजार 346.39 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून एकूण 21 हजार 495 शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटात अर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव तातडीने शासनास पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी महसूल व कृषी विभागास दिल्या होत्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानसाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे 106 कोटी 56 लाख 48 हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 21 कोटी 30 लाख रुपयांची मदत मंजूर झाली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील 21 हजार 495 शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान मंजूर करून महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यापुव जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे तसेच अन्य नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहिले होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ