- जाहिरात -spot_img
breaking news

सात दिवसांत 336 वाहनांवर कारवाई, सहा लाख दंड वसूल

विना नंबरप्लेट वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरूच

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा शहरात विना नंबर प्लेट आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय फिरणाऱ्या वाहनांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल 336 वाहनांवर कारवाई करत 5 लाख 74 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही आरोपी चोरीच्या दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट काढून त्यांचा वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर 17 ते 23 जून या कालावधीत श्रीगोंदा शहर आणि परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेदरम्यान विना नंबर प्लेट असलेली एकूण 336 वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वाहनधारकांकडून आरसी बुक, चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि वाहन परवान्यांची पडताळणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल करून जागेवरच नंबर प्लेट बसविण्यात आली आणि 315 वाहने सोडण्यात आली.मात्र, 21 वाहनमालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने सबंधित वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. एकूण 336 वाहनांवर कारवाई करत 5 लाख 74 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, मनोहर खिळदकर, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव, गोरख जाधव तसेच होमगार्ड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये धक्कादायक घटना, पुजार्‍याच्या नातवानेच फोडली मंदिराची दानपेटी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ