- जाहिरात -spot_img
breaking news

अकरा तोळे सोने घेऊनही लग्नात विघ्न, मेडिकल दुकानदाराला साडेपाच लाखांना गंडा, काय घडले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मुलीच्या लग्नाचे आमिष दाखवून हुंड्यापोटी तब्बल 11 तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये उकळल्यानंतर, आणखी पैशांची मागणी पूर्ण न केल्याने ठरलेले लग्न मोडल्याची संतापजनक घटना अहिल्यानगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची फसवणूक करून मानसिक छळ केल्याबद्दल चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत निवृत्ती जावळे (रा. पंढरपूर) याच्याशी अहिल्यानगरमधील एका तरुणीचा विवाह ठरला होता. लग्नाच्या बोलणीदरम्यान अभिजितची आई अलका निवृत्ती जावळे, आकांक्षा समर्थ कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांनी हुंड्याची मागणी केली होती. त्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यासाठी 5 लाख रुपये खर्च केले व नवरदेवाच्या कपड्यांसाठी 25 हजार रुपये पाठवले. त्यानंतर लग्नाचे धार्मिक विधी करण्याचे कारण सांगून संशयित आरोपींनी लग्नाआधीच मुलीच्या वडिलांकडून 11 तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे जमा करून घेतले.

लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना, आरोपी अभिजित व त्याच्या नातेवाईकांनी फर्निचर, भांडी आणि वरातीच्या खर्चासाठी आणखी 5 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. पीडित कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली असता, आरोपींनी अरेरावीची भाषा वापरत लग्न मोडल्याचा निरोप सांगितला. लग्नपत्रिका वाटून झालेल्या असताना ऐनवेळी लग्न मोडल्याने आणि 11 तोळे सोने परत न केल्याने अखेर पीडितेच्या आईने संगीता भरत धुमाळ यांनी आरोपी अभिजित जावळे, अलका जावळे, आकांक्षा कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

इन्स्टाग्रामवर फ्रेंचायझीची जाहिरात पडली महाग
अहिल्यानगर: डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने संगमनेर येथील एका मेडिकल दुकानदाराला तब्बल 5 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील पावबाकी रोड परिसरातील रहिवासी आणि मेडिकल व्यावसायिक महेश रामनिवास मुंदडा यांना संगमनेर येथे डिलीव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रेंचायझी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर आलेला एक अर्ज भरून आपली माहिती दिली होती. त्यानंतर मयांक गुप्ता, परमार नावाचा व्यक्ती आणि प्रियांका नावाच्या महिलेने मुंदडा यांच्याशी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला.

हे सुद्धा वाचा :  फसव्या कर्जमाफीविरोधात शासन निर्णयाची होळी....

या तिघांनी संगनमत करून फ्रेंचायझी देण्याच्या नावाखाली मुंदडा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणांसाठी पैसे भरण्यास सांगून मुंदडा यांच्याकडून 5 लाख 50 हजार रुपये उकळले. पैसे भरूनही फ्रेंचायझी न मिळाल्याने आणि संशयास्पद ईमेल आयडीवरून संपर्क होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुंदडा यांच्या लक्षात आले. अखेर महेश मुंदडा यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी मयांक गुप्ता, परमार आणि प्रियांका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ