- जाहिरात -spot_img
breaking news

कृषी गोदामावर पोलिसांची धाड; २२ लाखांचा खतसाठा जप्त, काय घडलं पहा…

खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन
सोनई | नगर सह्याद्री
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील एका कृषी गोदामावर सोनई पोलिसांनी कृषी विभागाच्या मदतीने मध्यरात्री छापेमारी करत विविध कंपन्यांच्या रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल 21 लाख 80 हजार 486 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित व्यक्तीविरुद्ध रासायनिक खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवे तुकाई येथील कृषी गोदाम फर्टिलायझर्स प्रा. लि. या गोदामात रासायनिक खतांच्या साठवणुकीबाबत संशय निर्माण झाल्याने दि. 15 जून रोजी रात्री 9 वाजल्यापासून 16 जून रोजी पहाटे 2.30 वाजेपर्यंत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान विविध कंपन्यांच्या खतांच्या गोण्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या.

या कारवाईत मायक्रोन्यूट्रिएंट, ग्रेड-पीडीएम, ग्रेड-प्रोम, बीएसएच ॲग्रोकेमिकल्ससह विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या एकूण 2,034 गोण्या जप्त करण्यात आल्या. जप्त खतसाठ्याची एकूण किंमत 21 लाख 80 हजार 486 रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी किरण चंद्रकांत बोंदकर (रा. केडगाव ता. जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाचे अधिकारी बाल्मिक एकनाथ सुडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

जप्त केलेला साठा पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नेवासा तालुक्यातील खत विक्री व साठवणूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  शाळा, मंदिर, दर्गा परिसरात खुलेआम दारू अड्डे ...कोणत्या गावातील प्रकार
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ