- जाहिरात -spot_img

तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;

सहा जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर:
केडगाव लिंक रोड परिसरातील एका मैदानात बोलावून जुन्या वादा मिटवण्याच्या बहाण्याने एका 20 वषय तरुणावर कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद जालींदर साळवे असे हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हर्षद साळवे हा महाविद्यालयात शिक्षण घेतो. काही दिवसांपूव माऊ साळवे नावाच्या व्यक्तीने त्याला फोन करून विनाकारण वाद घालत शिवीगाळ केली होती. त्यानंतर कृष्णा त्रिभुवन याने हर्षदला फोन करून जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने केडगाव लिंक रोड येथील यंत्री हॉटेलच्या मागे बोलावले. हर्षद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्याला बोलण्यासाठी शेजारच्या मैदानात नेले.

मैदानात पोहोचताच हर्षद आरणे, माऊ साळवे, कृष्णा त्रिभुवन, आलेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी हर्षदला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी माऊ साळवे याने लाकडी दांडक्याने तर कृष्णा त्रिभुवन याने दगडाने मारले. याच दरम्यान हर्षद आरणे याने दुचाकीच्या डिक्कीतून कोयता काढून हर्षदच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्‌‍यात हर्षद गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ला करत असताना एका आरोपीने मोबाईलवर याचा व्हिडिओ देखील बनवला. हर्षदच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हर्षद आरणे, माऊ साळवे, कृष्णा त्रिभुवन, आलेख आणि दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा :  सोबलेवाडीसह वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई... कशामुळे उद्भवली परिस्थिती
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com