spot_img
महाराष्ट्र'मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलाय', उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका

‘मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलाय’, उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला होता. राज्यात गाडीखाली एखादा श्वान जरी मेला तरी विरोधक जाब विचारतील, ही घटना तर मोठी आहे त्यामुळे विरोधक जाब विचारणारच असे ते म्हणाले होते. परंतु आता यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर मोठा घणाघात केलाय.

फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरे म्हणाले, सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभं रहात असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती मेलेडी खाओ सब जान जाओ. आता अशी परिस्थिती आहे ती ‘भाजपमे आओ सब भूल जाओ’ ही मोदी गॅरेंटी आहे. सरकार गुंडांच्या मागे उभं राहिलं तर अशीच गुंडगिरी राहील. यापुढच्या पिढ्या, आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का असा जनेतला प्रश्न जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...