spot_img
अहमदनगरअतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना एकूण 846 कोटी 96 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण 3 हजार 258 कोटी 56 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास 846 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शतची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...