spot_img
अहमदनगरभांडणे लावणार्‍यांना कायमची अद्दल घडवा, खासदार विखे पारनेरमध्ये काय म्हणाले पहा...

भांडणे लावणार्‍यांना कायमची अद्दल घडवा, खासदार विखे पारनेरमध्ये काय म्हणाले पहा…

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुयात ग्रामपंचायत असो की कोणतीही निवडणूक असो ती बिनविरोध न करता गावागावात भांडणे लावणार्‍यांना हद्दपार करण्याची वेळ आली असून लोकसभा निवडणुकीत शांतपणे व सामंजस्याने काम करीत कार्यकर्ते व जनतेने विरोधी उमेदवाराला कायमची अद्दल घडवावी असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पारनेर तालुयातील अळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष भास्करराव उचाळे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, निघोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील, अळकुटीचे उपसरपंच बाळासाहेब धोत्रे, किसनराव कारखिले, पाडळीचे माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्वेता वाघ, मळगंगा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनीताई पवार, तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता गायखे आदी असंख्य मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

बाहेर वातावरण विरोधी उमेदवाराला फार चांगले आहे हा हवेचा फुगा आहे तो फुटणार आहे. यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे डॉ. विखे पाटील म्हणाले. आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी माता भगिनी यांची भेट झाली. दर्शन घेण्याचा योग मला आला, हे मी माझे भाग्य समजतो. विरोधी उमेदवार संस्कृती सोडून काम करीत आहे. गेली चार वर्षे त्यांनी तालुयातील वातावरण दूषित केले आहे. तुम्ही भावनेपोटी मतदान केले, तुमची चूक तुम्हाला उमगली आहे.

मात्र येत्या १३ मे रोजी तुम्ही विचारपूर्वक मतदान करून मला निवडून द्याल हा मला विश्वास आहे. पारनेर तालुयातून मला ५० हजार मतांचे मताधिय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली १० वर्षांत सर्वसामान्य जनतेला भरभरून दिले असून मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तुमचे मतदान मृल्यवान असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक आघाडी अध्यक्ष भास्करराव शिरोळे,  राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीचेे सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी केले. अळकुटीचे उपसरपंच बाळासाहेब धोत्रे यांनी आभार मानले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...