spot_img
अहमदनगरपाण्याअभावी फळबागा जळू लागल्या...! शेतकरी हवालदिल, अहमदनगर जिल्ह्यात विदारक चित्र

पाण्याअभावी फळबागा जळू लागल्या…! शेतकरी हवालदिल, अहमदनगर जिल्ह्यात विदारक चित्र

spot_img

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयाला गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकर्‍यांनी शेतातील फळबागांचे लागवड केली होती. तालुयात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली आहे. मात्र पाणी अभावी फळबागा जळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च निघाला नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने अनेक वर्षांपासून फळबागा जपलेल्या जळून चालल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांचा ऊस करपून गेला आहे. तर पाण्याअभावी कलिंगड अर्ध्यावर सोडून द्यावे लागले असल्याचे चित्र तालुयात दिसत आहे. दरम्यान शेतकर्‍यांचे हाल होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून काही उपाययोजना केल्या जात नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

श्रीगोंदा तालुयाला पूर्ण आवर्तन न मिळाल्यामुळे तालुयातील फळबागा जळून चालले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेकडो एकरावर मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली आहे. पण सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून पाण्याअभावी तालुयातील फळबागा जळू लागल्या असून या बागा जगविणे शेतकर्‍यांसाठी मोठी आव्हान आहे. यावर्षी दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव, कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्यासाठी तालुयातील काही गावामध्ये ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. शेतकर्‍यांना फळबागा जगवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोठ्या कष्टाने लागवड केलेल्या बागेसाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. पण पाणी नसल्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा जळून जात असल्याचे विदारक चित्र श्रीगोंदा तालुयात दिसत आहे.

सध्या पाच हजार लिटरच्या लहान टँकर साठी २ ते ३ हजार रुपये शेतकर्‍यांना मोजावे लागत असून या पाण्यावर कशी तरी २००-३०० झाडे जगवत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून पाणी कमी पडत असल्याचे पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. फळबागा जगण्यासाठी पाणी विकत घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बागा जगवणे अवघड झाले आहे.

कुकडीचे आवर्तन सोडावे
कशी करावी शेती, पाणी मिळत नाही, मशागतीचा खर्चही निघत नाही, कुकडीचे आवर्तन वेळेवर सोडत नाहीत. सध्या पाणी नसल्याने फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी २ ते ३ हजार रुपये टँकरला मोजावे लागत आहेत. आता बँकेची कर्ज फेडायची कसे? चिंता तालुयातील शेतकर्‍यांना भेडसावत आहे. सध्या भीषण पाणी टंचाई भासत असून विकत पाणी घेऊन फळबागा जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी. कुकडी कॅनलचे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी महेश पवार, दादासाहेब ननवरे, बाळू चव्हाण, गौतम दांगडे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...