spot_img
अहमदनगरपुन्हा ताबेमारी? 'ते' आले आन सुरु झाले..; जमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून...

पुन्हा ताबेमारी? ‘ते’ आले आन सुरु झाले..; जमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून कटूंबावर हल्ला

spot_img

Ahmednagar Crime News: नेवासा तालुक्यातील वरखेड येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांसह हल्ला केल्याची घटना घडली असून नेवासा पोलिसांनी कृष्णा परदेशी सह 12 साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी दिली. या घटनेत जखमी झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले अजय रामकिसन नजन (वय 31), रा.वरखेड यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबाबात म्हटले की, माझे वडील रामकिसन रघुनाथ नजन हे दारू पित असल्याने त्यांना फसवून सन 2022 च्या दरम्यान आमच्या गावातील गौरव राजेंद्र वाकचौरे यांनी आमची वरखेड गावचे शिवारातील शेत गट नंबर 159/2 हि शेत जमीन त्याचे नावावर करून घेतली. त्या बाबत आम्ही नेवासा कोर्टात गौरव राजेंद्र वाकचौरे यांच्यावर दावा दाखल केला आहे. म्हणून गौरव राजेंद्र वाकचौरे याने सदरची शेती परस्पर अमोल बाळासाहेब मारकळी, रा. नेवासा बुद्रुक याचे नावावर सन 2024 मध्ये करून दिली आहे. परंतु शेतीचा ताबा आमचा असून सध्या शेतात कपाशीचे पीक आहे.

20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मी तसेच भाऊ, भावजय, माझी पत्नी असे शेतात काम करीत असताना तेथे अमोल बाळासाहेब मारकळी हा गैरकायद्याची मंडळी बिगर नंबरच्या ओमीनी कारमधून तसेच 3 ते 4 मोटारसायकल वरून असे एकत्रीत येऊन शेतीचा ताबा घेण्यासाठी येऊन कपाशी पिकाची नासधूस करून आम्ही शेतीचा ताबा देत नाही म्हणून त्याने त्याच्या हातातील लोखंडी गज हा मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्यात मारून मला गंभीररित्या जखमी केले व भांडणाची सोडवासोडव करण्यास माझा भाऊ, भावजई, पत्नी हे आले असता त्यांना देखील त्याच्या हातातील लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून आम्हाला जखमी केले आहे.

आमच्या झालेल्या भांडणाचा माझा भाऊ विजय रामकिसन नजन याने व्हिडीओ काढला आहे. म्हणून माझी अमोल बाळासाहेब मारकळी रा. नेवासा, कृष्णा परदेशी, विकास घोरपडे, राहुल बंदीवान, दिगंबर म्हस्के, बंडू शिंदे, देविदास सीताराम मुखेकर तसेच अनोळखी तीन महिला व आठ ते दहा पुरुष यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे. या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 109, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...