spot_img
अहमदनगरAhmednagar Politics News: 'नागवडे' कुटुंबच आमचा पक्ष, 'अनुराधाताई' आमच्या आमदार!; मेळाव्यात कार्यकर्त्यांचा...

Ahmednagar Politics News: ‘नागवडे’ कुटुंबच आमचा पक्ष, ‘अनुराधाताई’ आमच्या आमदार!; मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू हेच आमचे खरे दैवत, नागवडे कुटुंब हाच आमचा पक्ष आणि आगामी २०२४ विधानसभेच्या अनुराधाताई नागवडे याच आमच्या आमदार अशा तीव्र भावना श्रीगोंदा तालुयातील नागवडे समर्थक कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. आगामी २०२४ विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे समर्थकांचा भव्य असा कार्यकर्ता संवाद मेळावा छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. प्रारंभी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच तालुयाचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे बापू यांच्या प्रतिमेचे पूजन बापूंच्या जुन्या पिढीतील अंबादास दरेकर व गोपीचंद इथापे यांच्या हस्ते करुन मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी संचालक अंबादास दरेकर, गोपीचंद इथापे, तुळशीराम रायकर, विलासराव काकडे, सतीश मखरे, समीर बोरा, शरद जमदाडे, नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक निरीक्षक बी. के लगड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविक ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड यांनी केले. लगड म्हणाले की, आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नागवडे कुटुंबाला पक्षाकडून तिकीट मिळो अगर न मिळो परंतु अनुराधाताई नागवडे या निवडणुकीच्या रणांगणात उभ्या राहणार आहेत. नागवडे कुटुंबीयांनी सत्तेशिवाय तालुयात सहकार, कृषी, शिक्षण, सिंचन या क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. ४० वर्षे सत्ता नसताना नागवडे कुटुंबीयांनी तालुयात लाजवेल असे काम केले आहे. परंतु ज्यांच्या हाती चाळीस वर्षे तालुयाची सत्ता होती त्यांचे योगदान कुठेच दिसून येत नाही. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. यासाठी आता ज्या नागवडे कुटुंबीयांनी तालुयाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. त्या नागवडे कुटुंबांचा आता आमदार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

आता कार्यकर्त्यांनी बापूंच्या त्यागाची व भरीव विकासाच्या कार्याची प्रत्येक गावात जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. याप्रसंगी काष्टी गटातील कार्यकर्ते पाचपुते म्हणाले, मी जरी पाचपुते असलो तरी माझी विचारधारा ही नागवडे कुटुंबाशी खंबीरपणे जोडलेली आहे. नागवडे कुटुंबातील सुसंस्कृत विकासाची दिशा देणारी चांगली माणसे भेटली व मला देव भेटला असून अनुराधाताई नागवडे यांना सर्वात जास्त मताधिय देऊ अशी ग्वाही दिली. शहाजी गायकवाड म्हणाले की, आपण नागवडेंना का? आमदार केले पाहिजे यासाठी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. ४० वर्षात विद्यमान आमदारांचा लेखाजोखा तपासा आणि सहकार महर्षी बापूंचे ६० ते ६५ वर्षातील योगदान पहा मग खर्‍या अर्थाने तालुयाचा विकास कोणी साधला याची जाणीव होईल.

तालुयातील जनतेने विद्यमान आमदारांना ४० वर्षे संधी दिली. त्यांनी तालुयाची अक्षरशः रांगोळी केली आता कुठल्याही परिस्थितीत नागवडे कुटुंबातीलच आमदार करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्ते कुरुमकर म्हणाले की, नागवडे कुटुंब हे स्वच्छ प्रतिमेचे कुटुंब आहे. त्यामध्ये सहकार महर्षी बापूंचे तालुयासाठी असलेले भरीव योगदान. त्यामुळे अनुराधाताईंनी पक्षाचे तिकीट मिळो अगर न मिळो अपक्ष उमेदवारीची वेळ आली तरी मागे हटू नये सर्व कार्यकर्ते तन-मन-धनाने तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू अशी ग्वाही दिली. यावेळी संजय क्षिरसागर, समीर बोरा, वाजे आदी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीगोंदा तालुयातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नागवडे कारखान्याची संचालक प्रा. सुरेश रसाळ यांनी मानले.

निवडणूक लढवायचीच: नागवडे
विद्यमान आमदारांच्या बाबत सर्वसामान्यच्या भावना मोठ्या तीव्र आहेत. चाळीस वर्ष श्रीगोंदा तालुयाचे विद्यमान आमदारांनी स्वतःच्या प्रगतीसाठीच सत्ता भोगली. हे आपण सर्वजण पाहत आहोत. सहकार महर्षी बापूंनी मात्र सत्ता नसताना देखील गेली  ६५ वर्ष सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तालुयातील जनतेला जे जे हवे ते ते बापूंनी मिळवून दिले. वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे बापूंनी दुर्लक्ष केले परंतु सर्वसामान्य माणूस हेच माझे कुटुंब मानले. आता यापुढे राजकारणाची दिशा बदलली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता येऊन उमेदवारी जाहीर करतो. त्यामुळे राजकारणाची पूर्णतः खिचडी झालेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळो अगर न मिळो बापू हेच आपले दैवत! नागवडे हाच आमचा पक्ष असून निवडणूक लढवायची आहे. जैसी करनी वैसी भरणीअशी वेळ विरोधकांवर आलेली आहे.
राजेंद्र नागवडे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...