spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News: भर रस्त्यात काढली विद्यार्थीनीची छेड? गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News: भर रस्त्यात काढली विद्यार्थीनीची छेड? गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
क्लासवरून घरी जात असताना विद्यार्थीनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगरात राहणार्‍या पीडिताने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. साहील बलभीम सोनटक्के (रा. एकता कॉलनी, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी:19 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास युवती क्लासवरून घरी जात असताना साहीलने तिला रस्त्यात अडविले. ‘तु माझ्याशी बोलत का नाही, माझा फोन का उचलत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ‘तु जर माझ्याशी बोलली नाही, तर मी तुझे फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन, तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, सगळ्यांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली व तेथून निघून गेला.

तसेच साहील याने वेळोवेळी युवती कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला व त्रास दिला आहे. तिच्या भावाला फोन करून त्याच्यासह घरच्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बी. व्ही. सोनवणे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...