spot_img
देशDC vs GT : दिल्ली कॅपिटल्सचा शारदार विजय

DC vs GT : दिल्ली कॅपिटल्सचा शारदार विजय

spot_img

स्पोर्ट डेस्क : DC vs GT : गुजरातच्या मैदानावर बुधवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय साकारला. गुजरातचे फलंदाज यावेळी कुचकामी ठरले आणि त्यामुळेच त्यांचा डाव ८९ धावांत आटोपला. दिल्लीने यावेळी गुजरातवर सहा विकेट्स आणि ६७ चेंडू राखून सहज विजय साकारला.

गुजरातच्या ९० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या षटकात दिल्लीने १४ धावा काढल्या, पण दुसर्‍या षटकात त्यांना जेक प्रेझरच्या रुपात पहिला धक्का बसला. जेकने १० चेंडूंत २० धावा केल्या. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात पृथ्वी शॉदेखील बाद झाला, त्याला ७ धावाच करता आल्या. ऋषभ पंतने मैदानात येत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्लीने टॉस जिंकला आणि ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान शर्माने दिल्लीच्या संघाला पहिला धक्का दिला. इशांतने यावेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला ८ धावांवर बाद केले. गिल बाद झाला आणि त्यानंतर गुजरातचा डाव घसरायला सुरुवात झाली गिलनंतर वृद्धिमान साहा २ धावांवर आऊट झाला. त्यानंतर साई सुदर्शन १२, डेव्हिड मिलर २ आणि शाहरुख खान बाद झाले.

रशिद खानने काही काळ दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रशिदने यावेळी २४ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३१ धावांची खेळी साकारली. गुजरातचा संघ हा ८९ धावांत ऑल आऊट झाला.

दिल्लीकडून यावेळी सर्वात यशस्वी ठरला तो कर्णधार ऋषभ पंत. कारण पंतने यावेळी दोन झेल आणि दोन स्टम्पिंग्स केल्या. दिल्लीकडून यावेळी सर्वाधिक विकेट्स मुकेश कुमारने मिळवल्या. मुकेशने यावेळी २.३ षटकांत फक्त १४ धावा दिल्या आणि तीन बळी मिळवले. मुकेशला यावेळी इशांत शर्माने दोन बळी मिळवत चांगली साथ दिली. या दोघांनी यावेळी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये नवीन राजकीय समीकरणांची नांदी

शरद झावरे | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे माजी...

मळगंगा देवी श्रींच्या घागर दर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय

निघोज | नगर सह्याद्री राज्यात प्रसिद्ध असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या पारनेर तालुक्यातील...

मुलांना चाकूचा धाक दाखवून पळविला सात लाखांचा मुद्देमाल; वाळुंज दरोड्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील वाळुंज येथे ११ नोव्हेंबर २०२३ रोजी घालण्यात आलेल्या दरोड्याचा...

नगरमधील दोन्ही उमेदवार महायुतीचेच!; विखेंना मताधिक्य देऊन दहशतीचे राजकारण संपवा

सुजय विखेंचा सक्रिय प्रचार करण्याचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांचे समर्थकांना आवाहन /...