spot_img
ब्रेकिंगपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी नगरमध्ये, काय बोलणार याकडे लक्ष...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी नगरमध्ये, काय बोलणार याकडे लक्ष…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगरकर ज्या सभेचे आतूरतेने वाट पाहत आहेत. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा येत्या ७ मे रोजी नगरमधील संत निरंकारी भवन जवळचे मैदान, सावेडी येथे सांयकाळी ४ वाजता पार पडणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे. यामुळे नगरकरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये ६ तारखेला होणार होती. मात्र पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा एक दिवस पुढे ढकल्याने ही सभा आता ७ मे रोजी नियोजीत वेळेत होणार आहे. सध्या प्रचार अखेरच्या दिवसात असल्याने सर्वांना या सभेचे वेध लागले होते. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा नगरच्या भूमीत येत आहेत. निवडणुकीत आधीच खा. डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून पंतप्रधानांच्या सभेने त्यात अधीक भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरच्या निरंकारी मैदान येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. नगरकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांना ऐकण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार असून त्याचे नियोजन करण्यात सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...