spot_img
अहमदनगर'तुमची दादागिरी नगर शहर सहन करणार नाही; नगरी झटका १३ मे ला...

‘तुमची दादागिरी नगर शहर सहन करणार नाही; नगरी झटका १३ मे ला दाखवू’

spot_img

मनसे महिला जिल्हध्यक्षा अॅड.अनिता दिघे / प्रभाग १५ मध्ये भाजपच्या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद
अहमदनगर / नगर सह्याद्री
कोणीतरी आमदारकीचा राजीमाना देवून नगरच्या खासदारकीवर जर नजर ठेवत असेल तर आम्ही सहन करणार नाही. हे पारनेर नाहीये नगर आहे. नगरी झटका काय असतो तो आम्ही १३ मेला त्यांना दाखवून देणार आहोत. त्यांनी पारनेर एमआयडीसी खाल्ली आता नगरची एमआयडीसी त्यांना खाऊ देणार नाही. तुमची दादागिरी नगर शहर सहन करणार नाही. नगरकरांना उच्चशिक्षित, अभ्यासू व विकासकामे करणारे खासदार पाहिजे आहे. त्यामुळे आपण आपली ताकद दाखवून भाजपच्या सुजय विखेंना तीन लाख मताधिक्याने विजयी करूया, असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हध्यक्षा अॅड.अनिता दिघे यांनी केला.

भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर शहर भाजपच्या वतीने प्रभाग १५ मधील आगरकर मळा, आनंद कॉलनी व स्टेशन रोड परिसर मोठे शक्ती प्रदर्शन करत परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हध्यक्षा अनिता दिघे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर उपाध्यक्ष सचीन पारखी आदींसह मोठ्या संख्येने महायुतीच्या घटकपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अॅड.अभय आगरकर म्हणाले, भाजपच्या प्रचार फेऱ्यांना पूर्ण शहरात उत्स्फूर्त नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. त्यामुळे मतदारांनी सावधपणे मतदान करून जो स्थैर्य देत देशाचा विकास करू शकतो अशा मोदी सरकारलाच जनतेने पुन्हा निवडून द्यायचे आहे. समोरच्या विरोधातील आघाडीत एकही नेतृत्व नाही. प्रत्येक नेता स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करत आहे. म्हणून देशाच्या विकासाच्या शिखरावर नेणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी नगर दक्षिण मधून सुजय विखेंना विजयी करावे.

यावेळी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिवसेना निश्चितच खारीचा वाटा उलणार असून नगरमध्येही खा.सुजय विखेंना मोठे मताधिक्य देण्यास कटीबद्ध आहोत. प्रभाग १५ मधून खा.विखेंना निश्चित सर्वात जास्त लोड मिळेल अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी दिली.

यावेळी माजी उपमहापौर गीतांजली काळे, बाबूशेट टायरवाले आदींची भाषणे झाली. याप्रसंगी आनंदा शेळके, दत्ता गाडळकर, विशाल खैरे, पोपट पाथरे, अनिल लोखंडे, अनिल सबलोक, अनिल निकम, कुंडलीक गदादे, सुरेश लालबागे, पंडीत वाघमारे, गोपाल वर्मा, मयूर बोचुघोळ, स्वप्नील बेद्रे, बाळासाहेब भुजबळ, शशीकांत पालवे, दिपक देहरेकर, श्री.गायकवाड, सोमनाथ चिंतामणी, सुरेखा विद्ये, सविता कोटा, कालिंदी केसकर, श्वेता झोंड, संध्या पावसे, सुरेखा खैरे, वनिता बिडवे, सुनिता उल्हारे, मिरा सरोदे, कुसूम शेलार, वैशाली उदावंत, वंदना थोरवे, प्राची वाकडे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: धक्कादायक! भर बाजारपेठेत तरुणावर हल्ला

अहमदनगर | नगर सह्याद्री शिवसेनेचे पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी...

Ahmednagar News: रामवाडीत पुन्हा पाणीबाणी! महापालिकेचा कारभार कसा? तर ठेकेदार म्हणतील तसा, संतप्त महिलांनी घेतली ‘अशी’ भूमिका..

अहमदनगर । नगर सहयाद्री शहराच्या रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा तुटल्याने पाण्याची...

कार्ले कुटुंबाच्या ‘गोड’ उसाची ‘गोड कहाणी’

गावातील पशुधन जगविण्यासाठी अडीच एकरांतील उभा ऊस दिला मोफत; ऊस डोंगा परि रस नाही...

Politics News: नाशिकमध्ये मराठा समाज कुणाला देणार साथ? पत्रकार परिषदेत समाजाचा एकमुखी निर्णय, वाचा सविस्तर

नाशिक । नगर सहयाद्री लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक...