spot_img
अहमदनगरमुलांना चाकूचा धाक दाखवून पळविला सात लाखांचा मुद्देमाल; वाळुंज दरोड्यातील आरोपीला ठोकल्या...

मुलांना चाकूचा धाक दाखवून पळविला सात लाखांचा मुद्देमाल; वाळुंज दरोड्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील वाळुंज येथे ११ नोव्हेंबर २०२३ रोजी घालण्यात आलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील एक आरोपी प्रशांत घुमीर चव्हाण (वय २३, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) यास जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून लुटण्यात आलेल्या सोन्याच्य दागिन्यांपैकी एक लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

नगर तालुक्यातील वाळुंज येथे ११ नोव्हेंबर २०२३ रोजी जनार्दन संभाजी हिंगे (फिर्यादी-वय ३७) यांच्या घराचा दरवाजा अनोळखी सातआठ आरोपींनी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लहान मुलांना धरून चाकूचा धाक दाखविला व घरातील सात लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेले. याबत नगर तालुका पोलिस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश,यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा तपास करण्यातचे आदेश दिले होते. त्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रोहित येमूल, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशांची दोन पथके नेमून पथकांना रवाना केले.

हे पथक गेल्या ३० एप्रिल रोजी नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना वाळुंज शिवार येथील चोरी ही आरोपी प्रशांत चव्हाण (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) याने त्याचे इतर साथीदारांसह केल्याचे आढळून आले. पथकाने चिचोंडी पाटील गावातील एसटी स्टँड येथे जाऊन शोध घेतला असता एक संशयित इसम एसटी स्टँड परिसरात बसलेला दिसला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने प्रशांत घुमीर चव्हाण (वय २३, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे नाव सांगितले. अन्य साथीदारांबाबत विचारपूस करता त्याने लिमलेश देशपांड्या चव्हाण (फरार), ऋषिकेश दिगू भोसले (फरार), गणेश दिवाणजी काळे (फरार) (तिन्ही रा. वाकोडी, ता. नगर) आयलाश्या जंगल्या भोसले (रा. आष्टी, जिल्हा बीड, फरार) व लिमलेश चव्हाण याचे तीन अनोळखी साथीदारांनी मिळून हा दरोडा टाकल्याचे सांगितले.

अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथीदार लिमलेश देशपांड्या चव्हाण, ऋषिकेश दिगू भोसले (दोन्ही रा. हिवरा पिंपरखेड, ता. आष्टी, जिल्हा बीड), आयलाश्या जंगल्या भोसले अशांनी मिळुन नोव्हेंबर २०२३ मांडवे (ता. नगर) येथील एका घराच्या किचनचा दरवाजा तोडून चोरी केल्याचे सांगितले. तसेच इतर दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी प्रशांत घुमीर यांच्याकडून घराचे पाठीमागे शेतात पुरून ठेवलेले ३५ हजार रुपयांची सोन्याची मोहनमाळ, ३५ हजार रुपयाची सोन्याची अंगठी, ३५ हजार हजारांची सोन्याची पोत, २१ हजारांचे कानातले दागिने व १४ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

तो ताब्यात घेऊन आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करणयात आले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले याच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाहन चालवताना नुसता मोबाईल हातात घेतला, तरीही होतो का दंड? काय सांगतो कायदा, पहा

नगर सहयाद्री वेब टीम डिजिटलाच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे....

Ahmednagar News:नगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा वादळी तडाखा! कुठे-कुठे काय घडलं, आज कसे असेल हवामान? पहा एका क्लिकवर.

अहमदनगर। नगर सहयाद्री यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायेत....

आजचे राशी भविष्य! ‘या’ पाच राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार वरदान

मुंबई। नगर सहयाद्री मेष राशी भविष्य थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा - त्यामुळे...

Ahmednagar Crime: धक्कादायक! भर बाजारपेठेत तरुणावर हल्ला

अहमदनगर | नगर सह्याद्री शिवसेनेचे पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी...