spot_img
देशकृषी हवामान केंद्र बंद होणार? 'या' जिल्हाचा समावेश, कारण काय? वाचा सविस्तर

कृषी हवामान केंद्र बंद होणार? ‘या’ जिल्हाचा समावेश, कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित असल्याने देशभरातील शेतकर्‍यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आले. सध्या देशात १९९ केंद्र कार्यरत असून त्यांचा विस्तार करण्याऐवजी ही केंद्र बंद करावीत, अशी सूचना भारतीय हवामान विभागाने केली आहे. परिणामी पूर्वानुमान आणि मार्गदर्शनासाठी या केंद्रांवर अवलंबून असणारे लाखो शेतकर्‍यांसाठी ही चिंतेची बाब आहे.

यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षानंतर जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कामकाज करता येणार नाही, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. सध्याची ही १९९ केंद्रे १ मार्च २०२३ पूर्वी बंद करावीत, अशा सूचना आहेत. महाराष्ट्रात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे असून याचा फायदा हजारो शेतकरी घेत होते. भारतीय हवामान विभागाकडून येणार्‍या जिल्हा पूर्वानुमानापलीकडे जाऊन शेतकर्‍यांना शेतीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात होते. या शेतकर्‍यांनी आता मार्गदर्शनासाठी नेमके कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात पालघर, नंदुरबार, सोलापूर, धाराशीव, संभाजीनगर, नागपूर, बुलडाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती येथे ही केंद्रे आहेत. काही केंद्रांच्या माध्यमातून ३० ते ४० हजार, तर काही केंद्रांच्या माध्यमातून दोन ते तीन लाख शेतकर्‍यांपर्यंत माहिती जात होती, असा अंदाज नंदुरबार येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी वर्तवला. भारतीय हवामान विभागाने ही केंद्रे बंद होण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसबद्दल शेतकर्‍यांना सांगण्यात आले आहे.

नोटीसमध्ये केंद्र केवळ बंद करण्याची नोटीस आली असून शेतकर्‍यांसाठी पर्याय कोणता, याबद्दल माहिती दिलेली नाही. केंद्रांच्या माध्यमातून दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार कृषिसल्ला दिला जात होता. हवामानाबद्दलचे लहान-मोठे प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी केंद्रांपर्यंत थेट पोहोचत होते. या पूर्वी राहुरी, दापोली, परभणी, इगतपुरी, अकोला, वर्धा, कोल्हापूर येथे कृषी हवामान केंद्र प्रादेशिक स्तरावर स्थापित केले होते. मात्र प्रादेशिक स्तरावरील या केंद्रांपर्यंत आजूबाजूच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी पोहोचत नाहीत. त्यामुळेच जिल्हा केंद्रे सुरू करण्यात आली होती.

सुधारणेसाठी निर्णय
जिल्हा कृषी हवामान केंद्र सुधारणेसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. मात्र ही केंद्र बंद करताना त्याला सध्या दुसरा पर्याय काही नसून ही केंद्र पुन्हा कधी सुरू होतील याबद्दलही आता काही माहिती देता येणार नाही, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...