spot_img
देशPolitics News: 'तो' सोहळा म्हणजे शो!! 'राम भक्तीची लाट...' राहुल गांधी यांचा...

Politics News: ‘तो’ सोहळा म्हणजे शो!! ‘राम भक्तीची लाट…’ राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

spot_img

नवी दिल्ली-
देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा शो होता. आमच्याकडे देशाला बळ देणार्‍या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. त्यांना अयोध्या प्रश्नी विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. अयोध्येला जाणार का, असे विचारले असता गांधी म्हणाले, मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे.

युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकर्‍यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभ देशासमोर ठेवणार आहोत. आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मते आहेत. सगळे जग माझ्या विरोधात गेले तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार, असेही राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...