नवी दिल्ली / नगर सह्याद्री :
आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष आता तयारीला लागेल आहेत. यात भाजपने देखील आता कसून तयारी सुरु केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 22 आणि 23 डिसेंबरला दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली असून या बैठकीला देशातील सगळे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व मोर्चाचे अध्यक्ष या बैठकीसाठी येणार आहेत.
या बैठकीमध्ये इतर विषयांसोबत येत्या या लोकसभा निवडणुकीत 325 जागा जिंकण्याची रणनिती ठरवली जाणार आहे. यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली असून या बैठकीत लोकसभा निवडणूक, विकसित भारत संकल्प अभियान, विधानसभा निवडणूक समीक्षेसह अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे.
‘इतके’ कोटी मतदार मिळवण्याच असेल टार्गेट
लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांनी 35 कोटी मतदारांच टार्गेट सेट केल आहे. 2019 मध्ये भाजपाला 22 कोटी मत मिळाली होती. जिल्हा कार्यालयात 300 पेक्षा जास्त कॉल सेंटर कार्यरत केली असून जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि आमदार जनसंर्पक वाढवत आहेत. कॉल सेंटरच्या माध्यमातून 50 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे. पक्षासाठी सक्रीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरु आहे. याच कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. लाभार्थी सूचीमध्ये आणखी 70 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे.