spot_img
अहमदनगरनिवडणुकीच्या तोंडावर चाललंय काय? सोन्याने भरलेला ट्रक गवसला..

निवडणुकीच्या तोंडावर चाललंय काय? सोन्याने भरलेला ट्रक गवसला..

spot_img

पुणे। नगर सहयाद्री:-
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून आचारसंहिता सुरु झाली आहे. सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या होत आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी एक टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यामध्ये तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पो मध्ये आढळून आले आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो नेण्यात आलेला आहे.

हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी चालक आणि आणखी एक जणास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार शनिवारी नगर शहरात; अरुण पाटील कडू यांचा अभीष्टचिंतन सोहळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत योगदान देणारे ज्येष्ठ नेते,...