spot_img
अहमदनगरमहायुती नवा डाव टाकला! उत्सुकता संपली? पारनेर मतदार संघाचा उमेदवार ठरला! कुणाला...

महायुती नवा डाव टाकला! उत्सुकता संपली? पारनेर मतदार संघाचा उमेदवार ठरला! कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणीताई लंके यांच्या विरोधात कोण याबाबतची उत्सुकता अखेर संपली असल्याचे मानले जात आहे. माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांना अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेत नीलेश लंक यांनी बाजी मारल्यानंतर या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार तोडीस तोड देण्याबाबत खल सुरू होता.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आणि माजी सभापती काशिनाथ दाते यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, तोडीस तोड आणि तरुणांना आकर्षित करू शकणारा चेहरा म्हणून विजय सदाशिव औटी यांचे नाव अंतिम केल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून पुढे आली आहे.

माजी नगराध्यक्ष असलेले विजय औटी यांचा तरुणांचा मोठा संग्रह आहे. लंके यांना तोडीस तोड उमेदवार देण्यात आल्याने आता ही लढत चुरशीची होणार असल्याचे मानले जाते. दरम्यान, उमेदवारी नाकारलेले सुजित झावरे व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गाडेंचे बंड शमलं अन् शिवसैनिकांची शेवटची आशा देखील!

सारिपाट / शिवाजी शिर्के- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नगर शहरातील उमेदवारीसाठीचा सर्वात प्रबळ असणारा पक्ष...

नगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा…

संदेश कार्ले | गावात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी जाब विचारावा पारनेर | नगर सह्याद्री-  पक्ष पाहुन...

“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली...

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा…

धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल धुळे / नगर सह्याद्री : लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा...